बिलाच्या तारखेपूर्वीच वीज कापण्याची घाई!

Electricity-Bill
Electricity-Bill

औरंगाबाद - महावितरणच्या नाकर्तेपणामुळे निर्माण झालेल्या प्रचंड थकबाकी वसुलीच्या नावाखाली प्रामाणिक नागरिकांना त्रास देण्याचे धोरण अवलंबिले जात आहे. विशेष म्हणजे बिल भरण्याच्या तारखेच्या बारा दिवस आधीच वीजपुरवठा खंडित करण्याचा प्रताप महावितरणच्या सिडको विभागाने केला आहे. दुसरीकडे छावणी विभागाने एक महिन्यापासून मिटरसाठी ग्राहकाला झुलवत ठेवले आहे. 

कोट्यवधी रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी महावितरणने शून्य थकबाकी वसुली मोहीम सुरू केली आहे; मात्र या मोहिमेचा बडगा म्हणून वीजबिल भरण्याच्या दहा ते बारा दिवस अगोदरच वीजपुरवठा खंडित करण्याची मनमानी कर्मचाऱ्यांनी सुरू केली आहे. सिडको एन-६ येथील रहिवाशी व्ही. एन. टेहरे यांनी नियमीत बील भरणा केलेला आहे. त्यांना १,४६० रुपये बिल देण्यात आले असून, बिल भरण्यासाठी देय दिनांक ८ मार्च असा देण्यात आलेला आहे, असे असताना सोमवारी (ता. २६) अचानक लाइनमनने वीजपुरवठा तोडून टाकला.

बिल भरण्याच्या तारखेपूर्वीच वीजपुरवठा तोडल्याने टेहरे यांनी तातडीने जाऊन १४६० रुपये बिल आणि ५९ रुपये रिकनेक्‍शन चार्जेस भरल्यानंतरही वीजपुरवठा जोडण्यास टाळाटाळ सुरू केली. मात्र, या प्रकरणानंतर जाब विचारल्यानंतर मात्र तातडीने वीजपुरवठा जोडून देण्यात आला. मात्र, महावितरण कर्मचाऱ्याच्या मनमानी कारभाराने टेहरे कुटुंबीयांना दिवसभर मनस्ताप सहन करावा लागला.

याला भेटा, त्याला भेटा
दुसऱ्या एका प्रकरणात पेठेनगर येथील अशोक अवसरमल यांनी नवीन मीटर घेण्यासाठी २९ जानेवारी रोजी प्रस्ताव सादर केला. अमरप्रित येथील कार्यालयात अर्ज सादर केला, त्यानंतर छावणी कार्यालयात रीतसर पैसे भरले, त्यानंतरही मीटर दिले नाही. अवसरमल हे अभियंता जाधव यांना भेटले, तर त्यांनी लाइनमन उमेश बोर्डेला भेटण्यास सांगितले. उमेश बोर्डेला भेटले, तर ते टाळाटाळीची उत्तरे देत असल्याचे अवसरमल यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे तीस हजार मीटर उपलब्ध झालेले असल्याचे जाहीर सांगणारे महावितरणचे अधिकारी मात्र विद्युत मीटर बसवून देण्यासाठी आडवाआडवीचे धोरण अवलंबीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com