रेल्वेतून फुक्‍कट प्रवास करणाऱ्या 516 जणांवर कारवाई 

Nanded without ticket journey in train
Nanded without ticket journey in train

औरंगाबाद - विनातिकीट प्रवाशांना आळा घालण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातर्फे गुरुवारी (ता. 29) अचानक तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत 516 फुकट्या प्रवाशांकडून सव्वादोन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. 

सध्या लग्नसराई आणि परीक्षा संपल्यामुळे प्रवासीसंख्येत मोठी वाढ झाली आहे. गर्दीचा फायदा घेत अनेक "फुकटे' प्रवासीही प्रवास करतात. हे विनातिकीट बहाद्दर आरक्षित डब्यांमध्ये जागेवर कब्जा करून तिकीट असलेल्या प्रवाशांनाच अरेरावी करतात, परिणामी प्रामाणिक प्रवाशांना उगीच मनस्ताप सहन करावा लागतो. 

हा प्रकार रोखण्यासाठी रेल्वेने अचानक तिकीट तपासणी मोहीम हाती घेतली. वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक नेहा रत्नाकर, सहायक वाणिज्य व्यवस्थापक जोन बेनहर यांच्या नेतृत्वाखाली 32 तिकीट तपासणीस आणि दोन रेल्वे प्रोटेक्‍शन फोर्सचे जवान यांनी गुरुवारी पहाटे पाच वाजताच मोहिमेस प्रारंभ केला. यामध्ये नांदेड ते मुदखेड, नांदेड ते पूर्णा, नांदेड ते लिंबगाव अशा विविध भागांत धावणाऱ्या आठ पॅसेंजर आणि 15 एक्‍स्प्रेस गाड्यांची तपासणी करण्यात आली. 

मोहिमेत अनियमित प्रवास करणे आणि परवानगीशिवाय जास्त साहित्य घेऊन जाणारे आणि अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेते यांच्यावरदेखील कारवाई करण्यात आली. तसेच स्वच्छता, खाद्यपदार्थ, पाणी, पाण्याची उपलब्धता, पंखे, लाईट यांची चालू स्थिती यांचीही तपासणी करण्यात आली.

सावधान! पुन्हा राबविली जाणार मोहीम 
आगामी काळात विनातिकीट प्रवास करणाऱ्यांमध्ये धाक निर्माण व्हावा; तसेच विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी याच प्रकारची मोहीम वारंवार राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत कोणतीही रेल्वे गाडी उशिरा धावणार नाही, याचीही पूर्ण खबरदारी घेण्यात येणार आहे. प्रवाशांनी तिकीट घेऊनच प्रवास करावा व कारवाई होण्यापासून टाळावी. 
- त्रिकालज्ञ राभा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com