औरंगाबादेतील पोलिसी अत्याचाराचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल 

marathi news aurangabad police violence cctv video viral
marathi news aurangabad police violence cctv video viral

औरंगाबाद - औरंगाबादेतील मिटमिटा येथे पोलिसांनी दगडफेक केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या अतोनात अत्याचाराचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका घरात पाच ते सहाजण घुसून विद्यार्थ्याला ताब्यात घेवून पोलिस अक्षरश: झोडपून काढीत आहेत. घराच्या दरवाजावर ते लाथा मारुन तोडफोड करीत असल्याचे व्हिडीओतून स्पष्ट झाले आहे. 



मिटमिट्यात सात मार्चला पोलिस व नागरिक यांच्यात धूमश्‍चक्री झाली. यानंतर पोलिसांनी गावातील गल्लीबोळात शिरुन घरा-घरात घूसखोरी केली. दगडफेक व आंदोलनाशी संबंध नसलेली, निष्पाप मुलं, महिला आणि विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा तेथील नागरिकांचा आरोप आहे. घरातील संसारपयोगी वस्तूंची तोडफोड करुन सूमारे चाळीसपेक्षा अधिक नागरिकांच्या दूचाकीचे पोलिसांनी मोठे नुकसान केल्याचे समोर आले आहे. सातमार्चला सायंकाळी सव्वाचारला मिटमिटा गावातील एका घरात घूसून पोलिसांनी एका विद्यार्थ्याला बाहेर काढले, त्यानंतर लाठ्या-काठ्याने बेदम मारहाण केल्याचे सीसीटीव्हीतील फुटेजमध्ये दिसत आहे. व्हायरल झालेल्या या दुसऱ्या व्हिडीओवरुन पोलिसांनी गावातील नागरिकांसोबत केलेल्या अतोनात व्यवहार समोर आले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com