बीड : गणेश विसर्जन करताना मुलाचा बुडून मृत्यू 

पांडूरंग उगले
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

माजलगाव, (जि. बीड) : गावातील लहान मुलांनी स्थापना केलेल्या गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या पांडुरंग महादेव घायतीडक (वय १५) या मुलाचा बंधाऱ्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना उमरी (ता. माजलगाव, जि. बीड) येथे मंगळवारी (ता. ५) दुपारी दोन वाजता घडली.

दहा दिवस गणेशोत्सव साजरा करून सर्व गणेशभक्त आपल्या बाप्पाला निरोप देण्याच्या आनंदात तल्लीन आहेत. उमरी येथे एका गल्लीत लहान मुलांनी गणपतीची स्थापना केली होती. दहा दिवस गणेशोत्सव साजरा करून गावातील लहान मुलांनी गणपती विसर्जनासाठी मिरवणूक काढली होती. वाजत गाजत गावाशेजारी असलेल्या सरस्वती नदीवरील बंधाऱ्यात मूर्ती विसर्जनासाठी पांडुरंग घायतीडक याच्यासह काही मुलं पाण्यात गेली. खोल पाण्यात गेल्याने पोहता येत नसल्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. बंधाऱ्यात असलेल्या गाळात फसल्याने पांडुरंग बुडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मुलांनी आरडाओरड केल्यानंतर काही नागरिकांनी त्याला बाहेर काढून माजलगाव येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. माजलगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.