कर्ज, नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या 

कर्ज, नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या 

लोहा - जुना लोहा येथील शेतकरी आणि माजी नगरसेवक रमेश माधवराव शेटे (वय ४०) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. बुधवारी पहाटे ही घटना घडली. 

सततच्या नापिकीला व बँकेचे ३५ हजार रुपयांचे कर्ज फेडण्याच्या विवंचनेत ते राहत असत. एकत्रित कुटुंब पद्धतीत ते कुटुंबप्रमुख असल्याने भावाच्या मुलीचे लग्न करण्याची चिंताही त्यांना होती. या चिंतेतून रमेश शेटे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक बालाजी मोहिते व सहकाऱ्यांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे. २००३ ते २००८ या दरम्यान ते लाेहा पालिकेचे नगरसेवक हाेते. 

अगाेदर परीक्षा नंतर अंत्यसंस्कार 
दरम्यान, रमेश शेटे यांची मुलगी शिल्पा बारावीला आहे. नेमकी आजपासूनच बारावीची परीक्षा सुरू झाली. त्यात सकाळी वडिलांनी आत्महत्या केल्याने घरावर दुःखाचा डाेंगर काेसळला; मात्र वडिलांच्या आकस्मिक मृत्यूचे दु:ख गिळून आधी बारावीची परीक्षा आणि नंतर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय शिल्पाने धीराेदत्तपणे घेतला. एवढ्या दुःखद परिस्थितीत एकुलती एक मुलगी शिल्पाने दु:खावेग सावरत बारावीचा (विज्ञान) पहिला पेपर सोडवला. मुलगी असूनही शिक्षणापासून तिचा निश्चय तसूभरही ढळला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com