marathi news Farmers Association organized a road blockade in Maajalgaon.
marathi news Farmers Association organized a road blockade in Maajalgaon.

माजलगावात रास्ता रोको आंदोलन

माजलगाव (जि. बीड ) - ऊस दराबाबत शेतकरी संघटना आक्रमक असून ऊसाला भाव द्यावा, या मागणीसाठी शहरातील शिवाजी चौकात आज ता. 30 गुरुवारी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

तालुक्यातील तिन्ही साखर कारखान्यांनी पहिली उचल तीन हजार रुपये द्यावी, २६५ ऊस जातीची नोंद घेण्यात यावी, पंधरा दिवसात ऊसाचे पेमेंट करण्यात यावे या मागण्यांसाठी शहरातील शिवाजी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राजेंद्र होके, नितीन नाईकनवरे, डाॅ. उध्दव नाईकनवरे, नुमान चाऊस, शेख रशिद, लखन सावंत, रामचंद्र डोईजड यांचेसह अनेकजण सहभागी झाले होते.  दरम्यान या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. आंदोलनस्थळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com