बारावीच्या परीक्षेला जात असताना अपघात; 2 विद्यार्थी ठार

accident
accident

भोकरदन (जि. जालना) : भोकरदन-जालना रस्त्यावर ट्रक व मोटारसायकल या दोन वाहनात झालेल्या अपघातात एका विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोन परीक्षार्थी गंभीर जखमी झाले. त्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

घटनेविषयी सविस्तर वृत्त असे की, भोकरदन जालना रोडवर सकाळी दहा वाजेदरम्यान भोकरदनहुन जालन्याकडे जाणारा ट्रक जीजे 18 एएक्स 1977 व तडेगाव वाडीहून भोकरदन येथे बारावीच्या परीक्षेसाठी मोटारसायकलवर येणारे तीन विद्यार्थी यांची धडक होऊन सुनीलसिंग रुपसिंग घुनावत (वय २०) हा टायर खाली आल्याने दबून त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या मृतदेह अक्षरशः बारीक तुकडे होऊन रस्त्यावर रक्ताचा व मांसाचा सडा पडला होता. तर अनिल केसरसिंग घुनावत (वय १८) हा गंभीर जखमी झाला व करण काळूसिंग सुंदरडे हा देखील जखमी झाला. अनिल व करण हे बारावीच्या परीक्षेला भोकरदन येथे येत होते. तर सुनील हा त्यांच्यासोबत येत होता. ट्रक व चालक राजूर येथे पोलिसांनी ताब्यात घेतले.

घटनास्थळी ट्रकचे जवळपास पन्नास फूट ब्रेकचे निशाण रोडवर दिसत होते. घटनास्थळी बराच वेळ गर्दी होती. सुनील व अनिल हे मावसभाऊ होते. तिघेही जण तडेगाव वाडी ता.भोकरदन येथील रहिवाशी होते. गंभीर जखमी अनिल याचा देखील औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com