हाती पाट्या देऊन पंचनामे केल्यास कारवाई - खोत

हाती पाट्या देऊन पंचनामे केल्यास कारवाई - खोत

जालना - ग्रारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या हाती पाट्या देऊन त्यांच्या शेतीक्षेत्राचे पंचनामे करण्याचे कोणतेही आदेश शासनाने दिलेला नाहीत. अधिकाऱ्यांनी असे कृत्य जाणीवपूर्वक केले असेल, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले. 

वंजार उम्रद (ता. जालना) येथे गारपिटीमध्ये मृत्यू झालेल्या नामदेव लक्ष्मण शिंदे (वय 62) यांच्या कुटुंबीयांची मंगळवारी (ता. 20) भेट घेतली. गारपिटीने नुकसान झालेल्या थार (ता. जालना) येथील द्राक्ष बागेची पाहणी केली. 

शेतकऱ्यांच्या हाती पाटी देऊन पंचनामे केल्याचा प्रकार उस्मानाबाद जिल्ह्यात घडला होता. यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना खोत म्हणाले, गारपिटीने नुकसान झालेल्या शेतीक्षेत्राचे पंचमाने करताना शेतकऱ्यांच्या हाती पाटी देऊन फोटो कढण्याच्या सूचना शासनाने दिलेल्या नाहीत. हाती पाट्या देऊन पंचनामे करण्याची गरज का भासली, यासंदर्भात उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून कारण मागविले जाईल. पंचनामा करणाऱ्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक असा प्रकार केला असेल तर त्यांच्या त्या त्या विभागामार्फत कारवाई करण्यात येईल. 

"स्वाभिमानी' तर्फे घोषणाबाजी 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गोंदेगाव पाटी (ता. जालना) येथे खोत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शासनाच्या विरोधातही घोषणा दिल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com