लातूर जिल्ह्यात 132 दूधपुरवठा संस्थांचा ठावठिकाणा लागेना 

लातूर जिल्ह्यात 132 दूधपुरवठा संस्थांचा ठावठिकाणा लागेना 

लातूर - जिल्ह्यातील 132 दूधपुरवठा संस्थांचा ठावठिकाणाच लागत नाही. नोटिसा पाठविल्या तरी त्याचे उत्तर दिले जात नाही. त्यामुळे सहकारी संस्थांच्या (दूध) सहायक निबंधकांनी या संस्था अवसायनात काढण्याची कारवाई केली आहे. 

या दूधपुरवठा संस्थांना दरवर्षी लेखापरीक्षण करून घेऊन ते संबंधित विभागाला सादर करणे बंधनकारक आहे. असे असूनही या संस्थांनी अनेक वर्षांपासून लेखापरीक्षणच केले नसल्याचे समोर आले. तसेच दर पाच वर्षांना निवडणूक घेऊन त्याची माहितीही विभागाला कळविणे आवश्‍यक आहे; पण या संस्थांनी निवडणूकही घेतली नसल्याचे निदर्शनास आले आहे. दूधपुरवठा करणाऱ्या या संस्थांनी आपल्या सभासदांसोबत ठराव करून त्याची माहिती देणे बंधनकारक आहे; पण या संस्थांनी करारच केले नाहीत. तसेच ऑनलाइन पेमेंटही केले जात नसल्याची बाब उघडकीस आली आहे. जिल्ह्यात ठावठिकाणा लागत नसलेल्या 132 संस्था आहेत. यात सर्वाधिक 61 संस्था निलंगा तालुक्‍यात आहेत. त्यानंतर 22 संस्था औसा तालुक्‍यात आहेत. या संस्थांना नोटीस पाठवूनही त्यांनी उत्तरे दिलेली नाहीत. त्यामुळे सहायक निबंधकांनी या 132 संस्था अवसायनात काढून टाकल्या आहेत. 

लेखापरीक्षण न करणे, सभासदांसोबत करार न करणे आदी कारणांवरून या संस्था अवसायनात काढण्यात आल्या आहेत. चालू असलेल्या संस्थांनी सभासदांसोबत करार करून ऑनलाइन पेमेंट करणे बंधनकारक आहे. तसेच निवडणूक निधीदेखील जमा करणे गरजेचे आहे. या संस्थांनी सभासदांव्यतिरिक्त दूध घेतले, तर त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. 
-भगवान दुधाटे, सहायक निबंधक, सहकारी संस्था (दूध)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com