औरंगाबाद: दोन बनावट गुटख्याचे कारखाने सील 

योगेश पायघन
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

औरंगाबाद : मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनजवळ विनायक नगर आणि चिकलठाणा येथील हिनानगर येथील बनावट गुटखा कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) पथकाने एकाचवेळी छापा मारला. या धाडीत दोन बनावट गुटखा पॅकिंग करणाऱ्या यंत्रासह अंदाजे वीस लाख रुपयांचा कच्चा माल मुद्देमाल ताब्यात घेऊन सील केला. या वर्षाची पोलिसांना दूर ठेवून एफडीए ने केलेली मराठवाड्यातील पहिली मोठी कारवाई ठरली. 

औरंगाबाद : मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनजवळ विनायक नगर आणि चिकलठाणा येथील हिनानगर येथील बनावट गुटखा कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) पथकाने एकाचवेळी छापा मारला. या धाडीत दोन बनावट गुटखा पॅकिंग करणाऱ्या यंत्रासह अंदाजे वीस लाख रुपयांचा कच्चा माल मुद्देमाल ताब्यात घेऊन सील केला. या वर्षाची पोलिसांना दूर ठेवून एफडीए ने केलेली मराठवाड्यातील पहिली मोठी कारवाई ठरली. 

पहिल्या पथकाने सातारा परिसरातील खंडोबा मंदिर परिसरात राहणाऱ्या सय्यद मोसीन या गुटखा पुरवठादाराच्या घरी शुक्रवारी (ता एक ) सकाळी नऊ वाजता एफडीएच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला. त्यानंतर त्याला सोबत घेऊन मुकुन्दवाड़ी रेल्वेस्टेशन जवळील विनायक नगर येथील हनुमंत श्रीपत मुंडे या भागीदाराचे घर गाठले. तेथे सोनपापडी बनवणाऱ्या बेकरीत रामकुमार चंद्रवंशी (रा राजनांदगाव, छत्तीसगड) आणि संदीप श्रीहरी वाकेकर (रा पालोरा, जि. भांडारा) या कामगारांसह विविध प्रकारचा पॅकिंग घुटखा आणि विविध कंपनीच्या गुटखा पॅकिंग सामानासह पॅकिंग यंत्र आढळून आले. याची किंमत अंदाजे10 लाख 25 हजार रुपये असल्याचे आलेल्या एफडीए च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुख्य भागीदार मुंडे घरी नसल्याचे सांगून तेथील महिला सहकार्य करत नसल्याने एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दुपारी एक वाजता मुकुंदवाडी पोलीस ठाणे गाठून पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे यांना बोलावून आणले. 

दुसऱ्या पथकाने शुक्रवारी (ता एक ) सकाळी नऊ वाजता चिकलठाणा, हिना नगर येथील अजहर खान अकबर खान यांचे घर गाठले. त्याठिकाणी एका कंपनीच्या गुटखा पॅकिंगचे साहित्य आणि अडीच क्विंटल कच्चा माल व दोन गोण्या पॅकिंग गुटखा आठळून आला. याची अंदाजे किंमत 9 लाख 45 रुपये आहे.

या ठिकाणी या बनावट गुटख्याच्या कारखान्याचा मालक कारवाई पूर्ण होईपर्यंत घटना स्थळी आलेला नव्हता, अशी माहिती या पथकाचे प्रमुख सहाय्यक आयुक्त अशोक पारधी यांनी सांगितले. या दोन्ही छाप्यातील दोषींवर अन्न सुरक्षा व मानके 2006 या कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सहआयुक्त चंद्रकांत पवार यांनी सांगितले. 

यांनी केली कारवाई 
अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त चंद्रकांत पवार, सहाय्यक आयुक्त ए. जी. पारधी, नांदेडचे सहाय्यक आयुक्त रमेश जाधव, बीड चे सहाय्यक आयुक्त अभिमन्यू केरुरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी फरीद सिद्धकी, संजय चट्टे, निखिल कुलकर्णी, राम मुंडे, प्रशांत अंजीठेकर, वर्षा रोडे, संतोष कनकावाड, उमेश कावळे, योगेश कणले, मेघा फाळके, ज्योत्स्ना जाधव, नमुना सहाय्य्क लालाजी सोनटक्के, श्रीराम टापरे, लालचंद तशिवाल, श्री,नाडे, प्रमोद शुक्‍ला यांनी हि कारवाई दिली. 

एफडीआयची कारवाई; पोलीस अनभिज्ञ 
गुटखा विक्री करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना गुटखा पुरवणाऱ्यांवर पळत ठेवली. त्यानंतर साध्या वेशात अवैध गुटखा पुरवठादारावर पाळत ठेऊन त्यांना माल पुरवणाऱ्या बड्या स्टॉकिस्ट ला पकडण्यासाठी गेल्या दोन तीन दिवस खातरजमा करून सापळा रचला. त्यासाठी जालना, बीड, नांदेड जिल्ह्यातून अन्न सुरक्षा अधिकारी व सहाय्यकांना गुरुवारी शहरात पाचारण करण्यात आले होते. शुक्रवारी (ता एक) सकाळी नऊ वाजता एकाच वेळी दोन पथकांनी धाडीला सुरवात केली. चिकलठाणा आणि मुकुंदवाडीच्या दोन्ही छाप्यात वीस लाख रुपयांचा मुद्देमाल या पथकांनी हस्तगत करून पोलिसांशिवाय एफडीआयने कारवाई यशस्वी केली.