औरंगाबादमध्ये 'पद्मावती' चित्रपटाची पोस्टर्स फाडली 

मधुकर कांबळे
शनिवार, 21 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद : 'राजपूत राणी पद्मावतीविषची चुकीचा आणि काल्पनिक इतिहास चित्रपटात रंगविण्यात आला आहे. यामुळे केवळ राजपूत समाजाच्याच नव्हे, तर समस्त हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत' असा आरोप करत राष्ट्रीय राजपूत करणी सेना आणि राजपूत युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी 'राणी पद्मावती' या चित्रपटाची पोस्टर्स फाडली. 

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी 'पद्मावती' हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. यात दीपिका पदुकोण, शाहीद कपूर आणि रणवीरसिंह यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या 1 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

या चित्रपटाच्या जाहिरातीसाठी शहरात पोस्टर्स लावण्यात आली होती. 'या चित्रपटात पद्मावतीविषयी चुकीचे प्रसंग दाखविले आहेत' असा आरोप राजपूत करणी सेनेचे महासचिव आणि राजपूत युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष देविचंदसिंह बारवाल यांनी केला होता. तसेच, 'हा चित्रपट प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही' अशी भूमिकाही घेतली होती. या चित्रपटाचे पोस्टर्स काढून काढून टाकण्यासाठी त्यांनी मुदत दिली होती. पण या मुदतीत पोस्टर्स न हटविल्याने आकाशवाणीसमोरील परिसरात आणि मोंढा नाका येथे लावलेली पोस्टर्स कार्यकर्त्यांनी फाडली. 

'हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये दाखविला, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील' असा इशाराही करणी सेनेने दिला आहे. बारवाल यांच्यासह शहराध्यक्ष विनोद पवार, विजयसिंह राजपूत, जगतसिंह राजपूत, शैलेश राजपूत, चरणसिंह राजपूत, उदय राजपूत, सचिन राजपूत, विशाल राजपूत, हेमंत चव्हाण, 'आरपीआय'चे शहराध्यक्ष महेश रगडे, चंद्रसिंह राजपूत, सागर जाधव, सागर राजपूत, सागर ठाकूर, शेखर राजपूत, आकाश घुनावत, दीपक सूर्यवंशी यांनी पोस्टर्स फाडली.