प्रितम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली गोपीनाथगडावरून फेरीला सुरवात 

दत्ता देशमुख
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

बीड : मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संत भगवानबाबा यांच्या जन्मगावी सावरगाव घाट येथे होत असलेल्या दसरा मेळाव्यासाठी खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली गोपीनाथगडावरून वाहन फेरी निघाली. ही फेरी सावरगावपर्यंत असेल. 

डॉ. प्रितम मुंडे, ऍड. यश:श्री मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. आमदार आर. टी. देशमुख, आमदार संगीता ठोंबरे यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 'जय भगवान', 'जय गोपीनाथ' अशा घोषणांनी हा परिसर दुमदुमून गेला. 

पांगरी, सिरसाळा, दिंद्रुड, तेलगाव, वडगवणी, घाटसावळी, बीड येथे या रॅलीचे जोरदार स्वागत करण्यात आले. प्रत्येक ठिकाणी डॉ. प्रितम मुंडे यांचे औक्षण करण्यात आले आणि त्यानंतर ही रॅली मार्गस्थ झाली.