नितीन कटारिया खून प्रकरणातील मुख्य आरोपी जेरबंद

उमेश वाघमारे
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

जालना : जालना शहरातील प्लॉटिंग व्यवसायिक नितीन कटारिया खून प्रकरणातील मुख्य आरोपी सुभाष वैद्य याला स्थानिक गुन्हे शाखेने कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील लाढे जंगशन तेथे मंगळवारी (ता.१०) अटक केली आहे. त्याला बुधवारी (ता.११) पहाटे जालना येथे आणले.

शहरातील प्लॉटिंग व्यवसायिक नितीन कटारिया यांचा भरदिवसा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने आठ जणांना ताब्यात घेतले होते. मात्र, मुख्य आरोपी सुभाष वैद्य फरारी होता. स्थानिक गुन्हे शाखेने त्यांचे छायाचित्रही जारी केले होते.  वैद्य याचा पाच ते सहा राज्यात शोध सुरु होता.

स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके हे पूर्व किनारपट्टी ते पश्चिम किनारपट्टी असा शोध घेत कर्नाटक, तेलगणा आदी राज्यातही तेथील प्रादेशिक भाषेतिला वर्तमानपत्रात  सुभाष वैद्य यांचे छायाचित्र जारी केले होते. याच दरम्यान या खून प्रकरणातील मुख्य आरोपी वैद्य रेल्वेने प्रवास करत असल्याचा सुगावा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना लागला. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेने रेल्वे स्थानकावरील स्टेशन मास्टरांच्या संपर्कात होते. याच दरम्यान वैद्य हा कर्नाटक राज्यातील लाढे (जि. बेळगाव) येथील रेल्वे जंगशनवर असल्याची माहिती मंगळवारी (ता.१०) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे, अपर पोलिस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक कर्नाटककडे रवाना झाले व मुख्य आरोपी सुभाष वैद्य याला लाढे (जि. बेळगाव) जंगशन येथून अटक केली. त्याला बुधवारी (ता.११) पहाटे जालना येथे आणले असून त्याची चौकशी सुरू आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वारे, सचिन चौधरी, अंबादास साबळे, श्री. कांबळे, घोलप, चेके, गडदे यांनी केली.