दोन महिन्यांच्या मुलीला नाल्यात टाकून आईचे पलायन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

नांदेड : जिल्ह्यातील देगलूर येथील लोहिया मैदान परिसरात एका निर्दयी मातेने आपल्या दोन महिन्यांच्या मुलीला नाल्यात फेकून दिले. यानंतर ही महिला तेथून पळून गेली. 

स्थानिक नागरिकांनी तत्काळ त्या मुलीला बाहेर काढून उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिले आहे. त्या महिलेची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. नागरिक आणि पोलिस त्या महिलेचा शोध घेत आहेत. 

दरम्यान, अनैतिक संबंधांतून या मुलीचा जन्म झाल्याने तिला नाल्यात फेकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध देगलूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.