औरंगाबादेत कचरा पेटला; पोलिसांचा लाठीमार 

marathi news marathwada garbage issue police action
marathi news marathwada garbage issue police action

औरंगाबाद - मिटमिटा येथे कचरा टाकण्यावरुन आंदोलन पेटले असून औरंगाबाद - मुंबई महामार्गावरील मिटमिटा येथे कचरा टाकण्यास विरोधानंतर पोलिसांनी लाठीमार करुन अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यावेळी जमावाने तुफान दगडफेक करत कचऱ्याच्या दोन गाड्या पेटवल्या. दगडफेकीत दोन गाड्यांचे नुकसान झाले असुन नऊ पोलिस जखमी झाले आहेत. 

मागील 20 दिवसापासून औरंगाबाद शहरातील कचरा प्रश्‍न आंदोलनामुळे गंभीर झालेला आहे. शहराच्या परिसरातील गावांमध्ये कचरा टाकण्यासाठी ग्रामस्थांनी विरोध केला आहे. अनेकवेळा येथील आंदोलन हिंसक झाले आहे. आज बुधवारी मिटमिटा भागात कचरा टाकण्यासाठी गेलेल्या गाड्या अडवून त्या पेटवून देण्यात आला. जमाव मोठ्या संख्येने जमल्याने पोलिसांनी त्यांना पांगविण्यासाठी लाठीमार केला. यानंतर तुफान दगडफेक झाली. येथील आग आटोक्‍यात आणण्यासाठी तीन अग्नीशामक विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तर पोलिस उपायुक्त दीपाली धाटे घाडगे, विणायक ढाकणे हे परिस्थीतीवर नियंत्रण ठेऊन आहेत. सध्या पोलिस आक्रमक झाल्याने जमाव पांगवण्यात आला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com