नांदेड : पालकमंत्री खोतकर यांनी घेतले रेणुकादेवीचे दर्शन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 जुलै 2017

माहूर (जि. नांदेड) : नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज (शनिवार) माहूर येथील श्री रेणुकादेवीचे दर्शन घेऊन विधीवत पूजा आणि आरती केली.

माहूर (जि. नांदेड) : नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज (शनिवार) माहूर येथील श्री रेणुकादेवीचे दर्शन घेऊन विधीवत पूजा आणि आरती केली.

महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूर गडावरील श्री रेणुकादेवीच्या मंदिराला खोतकर यांनी आज सहकुटुंब भेट दिली. यावेळी श्री रेणुकादेवी संस्थानच्या वतीने विश्वस्त चंद्रकांत भोपी आणि संजय कान्नव यांनी प्रसाद देवून त्यांचा सत्कार केला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, तहसिलदार सिध्देश्वर वरणगावकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबुराव कदम, उपजिल्हा प्रमुख ज्योतीबा खराटे, विश्वस्त समिर भोपी, श्रीपाद भोपी, भवाणीदास भोपी आदी मान्यवर उपस्थित होते.