नवीन खोलीच्या मागणीसाठी गटशिक्षण कार्यालयात भरविली दोन तास शाळा

जगदीश बेदरे
शुक्रवार, 14 जुलै 2017

आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आज (शुक्रवार) विद्यार्थ्यांनी गेवराई येथील गटशिक्षण अधिकाऱ्याच्या कार्यालयातच दोन तास शाळा भरविली आणि विविध घोषणा दिल्या.

गेवराई (जि. बीड) - बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्‍यातील अंबु नाईक तांडा येथील जिल्हा परिषद शाळेसाठी एकच वर्ग असून तो ही मोडकळीस आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नव्या वर्गखोलीची मागणी केली होती. आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आज (शुक्रवार) विद्यार्थ्यांनी गेवराई येथील गटशिक्षण अधिकाऱ्याच्या कार्यालयातच दोन तास शाळा भरविली आणि विविध घोषणा दिल्या.

शाळेच्या मोडकळीस आलेल्या खोलीची तात्काळ दुरूस्ती करावी आणि नवीन खोल्याला मंजुरी मिळावी या मागणीसाठी विद्यार्थ्यानी गेवराई येथील गटशिक्षण कार्यालयात शाळा भरवली. विद्यार्थ्यांनी घोषणाही दिल्या. पंचायत समितीचे उपसभापती भिष्मा दाभाडे व विस्तार अधिकारी तुरूकमारे यांनी मध्यस्थी करून तात्पुरत्या स्वरूपाची पंधरा दिवसात तात्काळ व्यवस्था केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थी परत परतले.