यिन निवडणूक, नांदेड : कही खुशी कही गम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

नांदेड : सकाळ' माध्यम समूहाच्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क ‘यिन’च्या निवडणुकीची मतमोजणी व्हीआयपी रोड वरिल सकाळ कार्यालयात शनिवारी (ता.१२) रोजी पूर्ण झाली. भल्या सकाळी उत्सुकतेत मतमोजणी केंद्र गाठणारे उमेदवार अन्‌ त्यांच्या मित्रमंडळींचे चेहरे निकाल जाहीर होताच आनंदाने खुलले होते. ढोलताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत विद्यार्थ्यांनी विजयोत्सव साजरा केला. तर अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाल्याने काहींच्या चेहऱ्यावर निराशा दिसून येत होती.

नांदेड : सकाळ' माध्यम समूहाच्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क ‘यिन’च्या निवडणुकीची मतमोजणी व्हीआयपी रोड वरिल सकाळ कार्यालयात शनिवारी (ता.१२) रोजी पूर्ण झाली. भल्या सकाळी उत्सुकतेत मतमोजणी केंद्र गाठणारे उमेदवार अन्‌ त्यांच्या मित्रमंडळींचे चेहरे निकाल जाहीर होताच आनंदाने खुलले होते. ढोलताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत विद्यार्थ्यांनी विजयोत्सव साजरा केला. तर अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाल्याने काहींच्या चेहऱ्यावर निराशा दिसून येत होती.

जिल्ह्यातील शहर, तसेच ग्रामीण भागातील एकूण ११ महाविद्यालयांत झालेल्या निवडणुक पद्धतीने मतदान घेण्यात आले होते. परंतू यातील महात्मा गांधी मिशन संचलित आणि सहयोग कॉम्पस या तीन महाविद्यालयात बिनविरोध निवडणूक झाली. त्यामुळे शनिवारी (ता.१२) ला उर्वरित आठ"महाविद्यालयातील निवडणूकींचे निकाल जाहीर करण्यात आले. नांदेड जिल्हा पोलीस उपाधिक्षक अशोक बनकर आणि यीनचे जिल्हा समन्वयक कृष्णा शर्मा यांच्या उपस्थितीत सकाळी मतमोजणीला सुरवात झाली. सकाळ'च्या नांदेड जिल्हा आवृत्तीचे कार्यकारी संपादक संजय कुलकर्णी, युनिट व्यवस्थापक विलास कुलकर्णी, जाहीरात व्यवस्थापक मारोती सवंडकर यांची उपस्थित होती.

सकाळी अकरापासूनच सकाळच्या कार्यालया समोर विद्यार्थ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. मतमोजणीला सुरवात होताच उमेदवारांमध्ये चलबिचल सुरू झाली. शहरासह ग्रामिण भागातील विविध महाविद्यालयांतून आलेल्या विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोचली होती. निकाल जाहीर होण्यास सुरवात होताच जल्लोषाचे वातावरण तयार झाले. उमेदवारांना खांद्यावर घेत, मनसोक्‍त नाचत, तर काहींनी ढोलताशांच्या गजरात जल्लोष केला. फटाक्‍यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा करण्यात येत होता; तर दुसरी कडे अपेक्षे पेक्षा कमी मते मिळणाऱ्या उमेदवारांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून येत होती. असे असतांना देखील विजयी झालेल्या प्रतिस्पर्धास शुभेच्छा देऊन विद्यार्थी बाहेर पडत होते.

या निवडणूकीच्या संपूर्ण प्रक्रीयेत निवडणूक अधिकारी म्हणून भास्कर डोईबळे, कृष्णा इंगळे, शिवम अचार्य, शिवराज सोनटक्के, पिराजी गाडेकर, राजेश गिरडे, धनश्री कदम, बालाजी गिरे, गणेश रेड्डी. यांच्या सह महाविद्यालयातील प्राचार्य आणि प्राध्यापक यांनी मोलाचे सहकार्य केले.

बिनविरोध उमेदवार:

 • एमजीएम पत्रकारीता महाविद्यालय- भास्कर डोईबळे
 • एमजीएम ग्रंथालय माहिती शास्त्र महाविद्यालय-शिवराज सोनटक्के
 • सहयोग कॅम्पस- उज्वल पाईकराव

(यांची कॅम्पस महाविद्यालयातून बिनविरोध निवड झाली.)

महाविद्यालयनिहाय विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मतेः

शिवाजी महाविद्यालय कंधार

 • संगमेश्वर पंल्लेवाड-१४६
 • सुर्यवरद भास्कर-१०६
 • शेख ताहेर-७०
 • एकूण मतदान- ३४४, बोगस-६ मते, नोटा-१६ मते

कै. बाबासाहेब देशमुख कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय उमरी

 • मोगल इरफान- १४१ मते (४५ मतांनी विजयी घोषीत)
 • सुस्मीता देशमुख-९६ मते
 • एकूण मतदान- २५६, बोगस मते १९

संत गाडगे बाबा महाराज महाविद्यालय लोहा

 • शंकर कदम-१५६ मते (४६ मतांनी विजयी घोषीत)
 • शहाजी मोरे-११० मते
 • एकूण मतदान- २९६- बोगस मते- ३०

जवाहर लाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय नवीन नांदेड

 • विशाल जाधव- ६८ मते
 • शंकर चिलपिंपरे- १११ मते (४३ मतांनी विजयी घोषीत)
 • एकूण मतदान- २०१, २२ बोगस मते, नोटा आठ

कृषी महाविद्यालय नायगाव

 • पुरुषोत्तम सोळंके४४
 • विशाल राठोड-७६, (१२ मतांनी विजयी)
 • शुभम बंडापल्ले-४६
 • मंगेश पुयड-१५
 • योगिता बलवासकर-०२
 • रचना जोशी-१२
 • सचिन लोकरे-३७
 • बलवंत गाडे-१८
 • एकूण मतदान-२८२, बाद झालेली मते- ३२, नोटा-०३

राजीव गांधी महाविद्यालय मुदखेड

 • गवारे प्रकाश-१६ मते
 • दंदलवाड गजानन-१८ मते
 • राजेमाडे गैरव- ३१
 • सतिश जाधव-८४, (५३ मतांनी विजयी घोषित)
 • एकूण मतदान- १५४, बोगस मते- ०५

अन्न तंत्र-शास्त्र महाविद्यालय नायगाव

 • जाधव छत्रगुण-२१
 • हक्के कविता-५२
 • तुपेकर अजय-०० (निरंक)
 • स्वप्नील राठोड-०३
 • हेमंत बोमनाळे-०८
 • सोनम पांचाळ-०५
 • माधूरी ढगे-०१
 • गोविंद दाभाडे-०६
 • एकूण मतदान-१०६, बोगस मतदान १०

शरदचंद्र महाविद्यालय नायगाव बाजार

 • शेख मूस्ताक-७३ मते
 • मंगेश बच्छाव-१०६ (१५ मतांनी विजयी घोषित)
 • गजानन चिकाळकर-९१
 • एकूण मतदान-२८५, बोगस-१५ मते