जालन्यात पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार 

Marathi News_Jalna_Rape_ Five years girl_Crime
Marathi News_Jalna_Rape_ Five years girl_Crime

जालना - शहरातील नूतन वसाहत येथील एका पाच वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना मंगळवारी (ता.12) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. घटनेनंतर या प्रकरणी बुधवारी (ता.13) पहाटे दोन वाजताच्या सुमारास कदीम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणी पोलिसांनी एका नाराधमाला अटक केली. पीडित मुलीवर जिल्हा स्त्री रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

शहरातील नूतन वसाहत येथील एक पाच वर्षीय मुलीला चॉकलेट देण्याच्या आमिष दाखवून विनोद पैठणकर (वय 20, रा. राजवाडा, अशोक नगर) हा नराधम तिला घेऊन गेला. शहरातील मोतीबाग परिसरात मंगळवारी (ता.12) रात्री या पाच वर्षीय मुलीवर या नराधमाने बलात्कार केला. ही बाब मुलीच्या घरच्यांच्या लक्षात आल्यानंतर या मुलीला गांधी चमन येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्याने रात्री 2 वाजताच्या सुमारास तिला औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान पोलिसांनी मंगळवारी (ता.12) रात्री विनोद पैठणकर याला अटक केली. याप्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात बलात्काराचा व लहान अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com