मराठवाड्याच्या पाण्यावर नगरकरांचा पुन्हा डल्ला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जुलै 2016

औरंगाबाद - गेल्या तीन दिवसांत झालेल्या पावसाने नगरमधील अनेक धरणांतील पाणीसाठा ५० ते ७५ टक्‍क्‍यांपर्यंत गेला आहे, या धरणातील पाणी जायकवाडीत सोडावे लागू नये, म्हणून कालव्याद्वारे विहिरी, तलावाकडे वळवले जात आहे. नांदूर-मधमेश्‍वरच्या दोन्ही कालव्यातून पाणी सोडण्यात येत आहे; मात्र ते पाणी पिण्यासाठी सोडल्याचे कडा कार्यालयाच्या अभियंत्यांनी सांगितले.

नगर, नाशिकसह राज्यात तीन दिवसांपासून धुव्वांधार पाऊस सुरू आहे. नाशिकमध्ये गोदावरीला पूर आल्याचे राज्यभराने पाहिले. नगर जिल्ह्यातही पावसाने धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ केली आहे. पालखेड, भावली, भंडारदरा, मुकणे, नांदूर-मधमेश्‍वर ही धरणे ६५ ते ७५ टक्के भरली आहेत. या धरणातील पाणी जायकवाडीला सोडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, अनेक वर्षांपासून मराठवाड्याचे पाणी पळविण्याची परंपरा नगरवासीयांनी यंदाही सुरूच ठेवल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भरलेल्या या धरणातील पाणी कालव्याद्वारे वळवले जात आहे. नांदूर-मधमेश्‍वरच्या दोन्ही कालव्यातून शंभर ते दोनशे क्‍युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. या दोन्ही कालव्यांनी राहता व कोपरगाव या तालुक्‍यांना पाणी जाते. तर पालखेडच्या डाव्या कालव्यातून सुमारे चारशे क्‍युसेक आणि भंडारदरामधून ८२६ क्‍युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. नांदूर-मधमेश्‍वर आणि पालखेड या धरणातील कालव्यामधून पिण्यासाठी पाणी सोडल्याची शक्‍यता कडा कार्यालयाचे प्रभारी मुख्य अभियंता मनोहर पोकळे यांनी व्यक्‍त केली आहे. 

जायकवाडीवरील धरणातील पाणीसाठा
पालखेड  ७८.१३, नांदूर-मधमेश्‍वर ७५.८८, गंगापूर ४७.२७, दारणा ६६.१४, 
भावली --------- ६६.५१
मुकणे---------- ६६.००
भंडारदरा -------- ४०.७२
कडवा ---------- ३२.७०
वाघाड ---------- ३०.५०
निळवंडे --------  २३.१६
मुळा ------------ २१.००
गौतमी ---------- १६.१६
ओझरखेड ------- १२.३०

Web Title: Marathwada and Nagar again locked horns on water supply