मराठवाड्यात काँग्रेस नेत्यांसह पदाधिकारी उपोषणात सहभागी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

औरंगाबाद - केंद्र, राज्य सरकार सातत्याने दलित, अल्पसंख्याक, आदिवासी समाजाच्या विरोधात निर्णय घेत आहे. यामुळे दुर्लक्षित समाजावर अन्याय होत आहे. सामाजिक सलोखा व शांतता राहिलेली नाही. भाववाढीने सामान्य जनता त्रस्त झाल्याचा आरोप करीत काँग्रेसने मराठवाड्यात सोमवारी (ता. नऊ) जिल्हानिहाय एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. त्या-त्या जिल्ह्यातील नेत्यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. विविध मागण्यांचे प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.

परभणीमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत आंदोलन झाले. त्यांनी केंद्र व राज्य शासनावर टीका केली.  औरंगाबादेत जिल्हाध्यक्ष, आमदार अब्दुल सत्तार, शहराध्यक्ष नामदेव पवार यांच्या नेतृत्वाखाली शहागंजमधील गांधी पुतळ्यासमोर उपोषण झाले. नांदेडमधील आंदोलनात आमदार अमर राजूरकर, अमिता चव्हाण, वसंत चव्हाण, महापौर शीला भवरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई पवार जवळगावकर, पक्षाचे जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर यांच्यासह पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते सहभागी झाले. हिंगोलीत खासदार ॲड. राजीव सातव यांनी केंद्र व राज्य सरकार जातिधर्मात भांडण लावून तेढ निर्माण करीत असल्याचा आरोप केला. बीडमधील उपोषणात नेत्या रजनी पाटील, जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी आमदार सिराज देशमुख आदी सहभागी झाले. 

उस्मानाबादेत जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले. जालन्यातील गांधी चमन येथे झालेल्या उपोषणात जिल्हाध्यक्ष सुरेश जेथलिया, माजी आमदार कैलास गोरंट्याल, माजी मंत्री डॉ. शंकरराव राख आदी सहभागी होते. लातूरमध्ये जिल्हाध्यक्ष ॲड. व्यंकट बेद्रे, शहर-जिल्हाध्यक्ष मोईज शेख, माजी आमदार वैजनाथ शिंदे आदी सहभागी झाले.

Web Title: marathwada congress fasting politics