मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जुलै 2016

औरंगाबाद - मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आगामी 48 तासांत अतिवृष्टीची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

औरंगाबाद - मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आगामी 48 तासांत अतिवृष्टीची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
हवामान खात्याच्या कुलाबा वेधशाळेतर्फे यासंदर्भात शुक्रवारी (ता.आठ) दुपारी बारा वाजता इशारा जारी करण्यात आला. मराठवाड्यातील काही भागांत 7 सें.मी. ते 11 सें.मी. दरम्यान या काळात पाऊस पडण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली. मराठवाड्यात शुक्रवारी सकाळी आठ वाजता नोंदविण्यात आलेल्या गेल्या 24 तासांतील पावसाच्या नोंदीनुसार, 0.38 मिलिमीटर पाऊस पडला. या कालावधीत परभणी जिल्ह्यात सर्वाधिक 0.79 मि.मी. तर औरंगाबाद जिल्ह्यात सर्वात कमी 0.04 मि.मी. पाऊस झाला. विभागात आजपर्यंत अपेक्षित सरासरीच्या 89.3 टक्के, तर वार्षिक सरासरीच्या 22.6 टक्के पाऊस झाला आहे.

Web Title: marathwada heavy rains