आता मराठवाडा विकासाच्या संघर्षाचा लढावा लागेल- मुख्यमंत्री

मधुकर कांबळे
रविवार, 17 सप्टेंबर 2017

या लढ्यात अनेक स्वातंत्र्यसैनिक हुतात्मा झाले. मुख्यमंत्री फडणवीस, विधानसभाध्यक्ष हरीभाऊ बागडे, पालकमंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे यांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

औरंगाबाद : स्वातंत्र्यसैनिकांनी मराठवाड्याच्या मुक्तीचा मोठ्या संघर्षातून लढा लढला आहे. आजच्या पिढीला मराठवाडा विकासाच्या संघर्षाचा लढावा लागेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या वर्धापन दिनानिमित्त इथं रविवारी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. देश 1947 ला ब्रिटीशांच्या जोखडातून मुक्त झाला, मात्र मराठवाड्याला जुलमी निजामाच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी 17 सप्टेबर 1948 उजाडावे लागले.

या लढ्यात अनेक स्वातंत्र्यसैनिक हुतात्मा झाले. मुख्यमंत्री फडणवीस, विधानसभाध्यक्ष हरीभाऊ बागडे, पालकमंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे यांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या पिढीने आज विकासाचा लढा लढताना भ्रष्टाचार, दहशतवाद, शेतकऱ्यांची कर्जापासून मुक्तीसाठी सर्वांनी एकत्रीत लढा देण्याचे आवाहन करून सरकार यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही दिली.

धरणाची कामे मार्गी लावणार, मराठवाड्यात वॉटर ग्रिडचे काम लाकरच पूर्ण करणार, ओरिक सिटी मुले उधोगला चालना देणार, पीक विम्यात मराठवाड्याला मोठी मदत झाली, पीक कर्ज मुक्तीचे काम ऑक्टोबर मध्ये पूर्ण होणार, विकासाचा संरामातून मुक्त होईल, स्वतरसैनिकांना पुन्हा एकदा मानवंदना करतो, श्रद्धांजली अर्पण करतो.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :