जात-धर्माच्या नावावर देश तोडण्याचा प्रयत्न - कन्हैयाकुमार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

अंबाजोगाई - भ्रष्टाचारमुक्‍त करण्याचे स्वप्न दाखवून जातीयवाद, धर्माच्या नावावर देश तोडण्याचा प्रयत्न भाजप सरकार करत असल्याचा आरोप विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणांवर त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. 

दिवंगत खासदार गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या स्मृती दिनानिमित्त सोमवारी येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर भालचंद्र कांगो होते. कन्हैयाकुमार म्हणाले, देशाला "अच्छे दिन'चे स्वप्न दाखविणाऱ्या या सरकारने भ्रष्टाचारमुक्‍त भारत, "सबका साथ-सबका विकास'चा नारा दिला; परंतु भ्रष्टाचारी लोकांनाच पक्षात घेऊन विकास कसा साधणार? "सबका साथ- सबका विकास' नव्हे, तर भाजपचा विकास सुरू आहे. "विकास' व "भ्रष्टाचार' हे भाजपसाठी समानार्थी शब्द झाले आहेत. पतंजली'च्या वस्तू खरेदी करून देशसेवा नव्हे, तर "पतंजली'चीच सेवा होते.'' भाजपला कॉंग्रेसमुक्‍त भारत हवा आहे की नेहरू, आंबेडकर, पटेलमुक्‍त भारत पाहिजे? असा सवाल त्यांनी केला.