सोने व्यापाऱ्यास भरदिवसा लुटले 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

नळदुर्ग - सोने व्यापाऱ्यास बेदम मारहाण करून चार लाख रुपये पळविल्याचा प्रकार सोमवारी (ता. 19) दुपारी तीन ते साडेतीनच्या सुमारास घडला. हैदराबाद-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील फुलवाडी पाटीजवळ (ता. तुळजापूर) ही घटना घडली. पोलिसांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवून दोघांना पकडले. 

नळदुर्ग - सोने व्यापाऱ्यास बेदम मारहाण करून चार लाख रुपये पळविल्याचा प्रकार सोमवारी (ता. 19) दुपारी तीन ते साडेतीनच्या सुमारास घडला. हैदराबाद-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील फुलवाडी पाटीजवळ (ता. तुळजापूर) ही घटना घडली. पोलिसांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवून दोघांना पकडले. 

पोलिसांनी सांगितले, की हैदराबाद येथील कीर्तिकुमार गुलाबचंद बयाज, कैलासचंद धीरूलाल पांड्या व शरणसिंग बलवंतसिंग हे व्यापारी चालक सुरेंद्रसिंग राजपूत याच्यासह सोमवारी हैदराबादहून मुंबईकडे कारने निघाले होते. दुपारी तीन ते साडेतीनच्या सुमारास फुलवाडी पाटीजवळ पांढऱ्या रंगाच्या बोलेरो गाडीतून आलेल्या काही जणांनी कैलासचंद पांड्या यांना बेदम मारहाण करून त्यांच्याजवळील रोख रुपये चार लाख घेऊन पोबारा केला. या प्रकरणात कारचालक सुरेंद्रसिंग राजपूत हा सामील असल्याचा पोलिसांचा संशय आहे. या प्रकरणी कीर्तिकुमार बयाज यांच्या फिर्यादीवरून सुरेंद्रसिंग राजपूत, खुशालसिंग राजपूत, नवाराम, नेमाराम (पूर्ण नाव समजू शकले नाही) व अन्य चार अनोळखी आरोपींविरुद्ध नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी दोघांना पोलिसांनी पकडले आहे. आणखी सहा जण असण्याची शक्‍यता आहे. सहायक पोलिस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी तपास करीत आहेत. 

टॅग्स

मराठवाडा

औरंगाबाद : उर्ध्व भागात सतत जोरदार पाऊस होत असल्याने मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या जायकवाडीतील पाणीसाठा 88.10 टक्‍यावर...

02.21 PM

माजलगाव (जि. बीड) : शहरालगतच असलेल्या अकरा पुनर्वसित गावामध्ये ऐन सणासुदीच्या दिवसांत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा  ...

12.09 PM

औरंगाबाद - नेत्यांची मनमानी आणि तालुकास्तरावर पोचलेल्या गटबाजीचा फटका काँग्रेसला ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर बसण्याची शक्...

10.03 AM