पीक विम्याची वेबसाईट हँग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

  • आज (शुक्रवारी, ता. ४) तरी पीक विमा भरण्यात येईल या आशेने शेतकरी पुन्हा सेतू सुविधा केंद्रात आले मात्र आजही ते संकेतस्थळ उघडलेच नाही. त्यामुळे पुन्हा आजही रिकाम्या हातानेच परतावे लागले.

वालसावंगी (जि. जालना) : पंतप्रधान पीक विमा योजनेला मुदतवाढ मिळाली खरी मात्र येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेला या संबंधी आदेश मिळाले नसल्याने त्यांनी या निर्णयाला केराची टोपली दाखवून सेतू सुविधा केंद्राचा रस्ता दाखविला मात्र प्रधानमंत्री पीक विमा योजना हे संकेतस्थळ काल (ता.३) आणि आज दिवसभर बंद असल्याने एकही शेतकऱ्यांचा पीक विमा भरण्यात आला नाही.

दिवसभर शेतकरी सेतू सुविधा केंद्रसमोर ठाण मांडून बसले होत. मात्र वेबसाईट बंद असल्याने त्यांच्या पदरी निराशा पडली. पीक विमा ऑफलाईन बंद झाल्याने ऑनलाईन पीक विमा भरण्याखेरीज दुसरा पर्याय उरला नसल्याने शेतकरी सेतू सुविधा केंद्राकडे सकाळपासूनच रीघ लागली होती. त्यांची निराशा झाली.

आज (शुक्रवारी, ता. ४) तरी पीक विमा भरण्यात येईल या आशेने शेतकरी पुन्हा सेतू सुविधा केंद्रात आले मात्र आजही ते संकेतस्थळ उघडलेच नाही. त्यामुळे पुन्हा आजही रिकाम्या हातानेच परतावे लागले.

एकूणच आज शेतकरी द्विधा मनःस्थितीत दिसला. काही शेतकऱ्यांनी बँकेत खेटे मारले तर काहींनी पीक विमा भरला जात नसल्याने तडक शेतात जाणे पसंत केले. बऱ्याच शेतकऱ्यांचा पीक विमा भरण्याचे बाकी असल्याने अजून तारीख वाढवून मिळण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

ई सकाळवरील इतर ताज्या बातम्या: