त्रस्त बळीराजा मागण्यांसाठी बसलाय सरणावर...

पांगरा ढोणे (ता.पूर्णा) - येथील तुकाराम ढोणे व माणिक सूर्यवंशी या शेतकऱ्यांनी सरण रचून सरसकट कर्जमाफीसाठी बुधवारपासून सुरू केलेले बेमुदत उपोषण.
पांगरा ढोणे (ता.पूर्णा) - येथील तुकाराम ढोणे व माणिक सूर्यवंशी या शेतकऱ्यांनी सरण रचून सरसकट कर्जमाफीसाठी बुधवारपासून सुरू केलेले बेमुदत उपोषण.

पूर्णा (जि. परभणी) - सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी पांगरा ढोणे व निळा (ता. पूर्णा) येथील दोन शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात लाकडाचे सरण रचून त्यावर बुधवारपासून (ता.१३) उपोषण सुरू केले आहे. पांगरा ढोणे येथील तुकाराम ढोणे आणि निळा येथील माणिकराव सूर्यवंशी असे उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे आहेत. 

पांगरा शिवारातील ढोणे यांच्या शेतातील गट नं २६५ मध्ये बोंडअळीने बाधित झालेल्या कपाशीच्या पिकात हे उपोषण सुरू आहे. हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून न्याय मिळावा यासाठी हे उपोषण सुरू आहे.

शासनाने पीककर्ज माफीची घोषणा करून ऑनलाइन माहितीही भरून घेतली; मात्र अद्यापही पीककर्ज माफ झाले नाही. त्यामुळे अधिवेशन संपेपर्यंत कर्जमाफी करावी, चालू रब्बी हंगामासाठी कर्ज देण्यात यावे, अशी मागणी उपोषणकर्ते करीत आहेत. याशिवाय, शेतीपूरक उद्योगांवरील कर्ज माफ करा, शेतमालास हमीभाव जाहीर करा, डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादकांना हेक्‍टरी ३० हजार रुपये अनुदान द्या, उत्पादनात घट झालेल्या पिकांना भरपाई द्या, शेतकऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी विनाअट शैक्षणिक कर्ज द्यावे.

शैक्षणिक शुल्क माफ करावे, शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी कन्यादान योजनेंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात यावे आदी मागण्याही या शेतकऱ्यांनी केल्या आहेत. तुकाराम ढोणे यांनी दोन वेळा कोरड्या विहिरीत, तर एकता गोदावरी नदीपात्रात टोकऱ्यात बसून कर्जमाफीसाठी उपोषण केले होते.

चार फुटांचे सरण

उपोषणास बसलेल्या दोन शेतकऱ्यांनी सरण रचण्यासाठी तीन बैलगाड्या लाकडे गोळा केली आहेत. या लाकडांपासून त्यांनी चार फुटांचे सरण उपोषणासाठी रचले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com