पैठण शहरात अनेकजण तापाने फणफणले

पैठण शहरात अनेकजण तापाने फणफणले

पैठण - शहरात डास व घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे अनेक रुग्‍ण तापाने फणफणत असून साथीच्‍या आजाराने अनेक जण हैराण झाले आहेत. रुग्‍ण संख्येत वाढ झाली असून, डासांचा नायनाट करण्यासाठी कीटकनाशक फवारणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

शहरातील गल्लीबोळात गटारी वेळेवर स्वच्छ केल्या जात नसल्याने घाण, कचरा व सांडपाण्याच्या ठिकाणी डास वाढले आहेत. थंडीत आरोग्याच्या तक्रारी वाढत असल्यामुळे सरकारी व खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेण्यासाठी गर्दी होत आहे. शहरात साफसफाई नीट होत नसल्याची तक्रार केली जात आहे. नगरपालिकेचा स्वच्छता विभाग झोपी गेला की काय, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. ही नगरपालिका कचरा उचलत नाही. त्यामुळे स्वच्छता करूनही कचरा पुन्हा रस्त्यावर येत आहे. डासांचा त्रास लहान मुलांना अधिक होत असून त्यासाठी नगरपालिका प्रशासनाने वेळीच पावले उचलावीत नसता आरोग्य धोक्‍यात येण्याची शक्‍यता आहे. 

दिवसा ढगाळ, तर रात्री उकाड्याचे वातावरण 
वातावरणातील बदलानेही साथीचे आजार वाढत आहेत. दिवसभरात अनेकवेळा ढगाळ वातावरण पसरते व रात्री उष्णतेचा उकाडा निर्माण होत आहे. त्यामुळे ताप, थंडी, सर्दी, खोकला व घशात खवखव अशा आजारांनी नागरिकांना घेरले आहे. साथीच्या आजारांना हे प्रदूषणयुक्त वातावरणपुरक असल्यामुळे नागरिकांत संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. शरीरातील प्रतिकारशक्ती कमी असल्याने लहान मुले, वृद्ध नागरिकांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. 

डासांचे वाढते प्रमाण व हवामान बदलामुळे सर्दी, खोकला व ताप या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णालयात उपचार करण्यासाठी रुग्ण येत आहेत. नागरिकांनी संसर्गजन्य आजाराचा धोका टाळण्यासाठी आजार वाढण्यापूर्वी उपचार करून घ्यावेत. 
- डॉ. विष्णू बाबर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com