मराठवाड्याचा कालबद्ध विकास - फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 ऑक्टोबर 2016

सकाळ वृत्तसेवा
औरंगाबाद, ता. ४ : मराठवाड्याच्या पदरात ४९ हजार २४८ कोटी रुपये टाकण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. हे आर्थिक पॅकेज नव्हे, तर कामांचा कालबद्ध आराखडा तयार केला असून, यातील काही योजना पुढील वर्षी, काही दोन वर्षांत, तर काही चार वर्षांत पूर्ण होतील, असे त्यांनी स्पष्ट केले. तब्बल आठ वर्षांनंतर आज येथील विभागीय आयुक्तालयात मंत्रिमंडळ बैठक झाली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील दहा लाख हेक्‍टरवरील सोयाबीन आणि पाच लाख हेक्‍टरवरील कापूस, तूर व इतर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याची गरज नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेद्वारे मदत दिली जाईल. मराठवाड्यातील ७८ टक्के शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असून, त्यांना हा लाभ मिळेल. उर्वरित २२ टक्के शेतकऱ्यांनाही मदत दिली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले. अतिपावसामुळे वाहून गेलेली जमीन, रस्ते-पुलांचे नुकसान आदींची माहिती घेतली जात असून, तातडीने पुढील कार्यवाही केली जाईल, असेही ते म्हणाले.
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, पर्यावरणमंत्री रामदास कदम, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यावेळी उपस्थित होते.

वर्षभरात सर्व प्रश्‍न सुटतील, असा दावा नाही. मराठवाड्याच्या विकासासंदर्भात दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेतले आहेत. मराठवाड्याच्या भविष्याची वाटचाल ठरवण्याचा प्रयत्न आहे. 
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

Web Title: Marathwada periodic progress