वीज कोसळून चुलत भावंडांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

मरखेल - देगलूर तालुक्‍यातील रमतापूर येथे शुक्रवारी वादळी पावसात शेतात काम करणाऱ्या दोन सख्ख्या चुलतभावांवर वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाला.

मरखेल - देगलूर तालुक्‍यातील रमतापूर येथे शुक्रवारी वादळी पावसात शेतात काम करणाऱ्या दोन सख्ख्या चुलतभावांवर वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाला.

रमतापूर येथील गोपाळ पंढरी पाटील (वय 32) व ज्ञानेश्वर शंकरराव पाटील (वय 17) हे दोघे खरीप हंगामपूर्व मशागतीच्या कामासाठी शिवारातील स्वतःच्या शेतात गेले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट सुरू झाला. पाऊस पडत असल्याने दोघेही शेतातील गोठ्यात थांबले असता गोठ्यावर वीज कोसळली. त्यांना उपचारासाठी हणेगाव येथील आरोग्य केंद्रात दाखल केले असता डॉक्‍टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.