आज होणार नवीन महापौर, उपमहापौरांची निवड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 डिसेंबर 2016

औरंगाबाद - महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक बुधवारी (ता.14) सकाळी 11 वाजता विशेष सर्वसाधारण सभेत होईल. महापौरपदासाठी भाजपचे बापू घडामोडे यांना, तर उपमहापौरपदासाठी अपक्ष नगरसेविका स्मिता घोगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना-भाजपा युतीला 58 पेक्षा अधिक नगरसेवक जमविण्यात यश आले आहे. त्यामुळे युतीच्या उमेदवारांचा विजय निश्‍चित मानण्यात येत आहे. एमआयएम, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीकडून रात्री उशिरापर्यंत आकड्यांची जुळवाजुळव करण्यात येत होती.

भाजपने बापू घडामोडे यांच्या नावाची निवड केली, तर शिवसेनेने अपक्ष नगरसेविका स्मिता घोगरे यांच्या नावाची घोषणा केली आहे. युतीचे मोजकेच नगरसेवक लोणावळा येथे सहलीवर गेले असून बुधवारी मतदानाच्या दिवशी सकाळी सहलीवर गेलेले नगरसेवक थेट महापालिकेत येतील. गेल्या दोन दिवसांत युतीने बहुमतापेक्षा अधिक नगरसेवकांची जुळवाजुळव करून ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले. युतीचे दोन्ही उमेदवार निवडून येणार असल्याचा दावाही स्थानिक नेत्यांनी केला. बुधवारी (ता.14) सकाळी 11 वाजता विशेष सर्वसाधारण सभेत फक्त निवडणुकीची औपचारिकता पूर्ण करण्यात येणार आहे. पीठासीन अधिकारी म्हणून विभागीय आयुक्‍तांनी नियुक्‍त केलेल्या जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय काम पहाणार आहेत. निवडणुकीपूर्वी सभागृहाच्या सर्व यंत्रणेची मंगळवारी (ता.13) सकाळी महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी पाहणी करून निवडणुकीदरम्यान कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये यासाठी विद्युत यंत्रणा, ध्वनी व्यवस्थेचा आढावा घेतला.

मराठवाडा

नांदेड : सरकारी कार्यालयात एखादे काम करायचे असल्यास नागरिकांच्या कपाळावर आठया पडतात. कारण कोणत्या कामाला किती दिवस लागतील व...

02.18 PM

औरंगाबाद : वंदे मातरम् वरून आज (शनिवारी) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ झाला. शिवसेना-भाजप आणि एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये...

01.57 PM

मुखेड : मुखेड येथील शाहीर अण्णाभाऊ साठे माध्यमिक व उच्चामाध्यमिक विद्यालयाचे शिक्षक बाबुराव परशुराम पवळे यांनी शुक्रवारी सकाळी...

11.15 AM