लीटरला पाच रुपये अनुदानासाठी स्वाभिमानीतर्फे दूध आंदोलन 

Milk movement for a grant of 5 rupees to Liters
Milk movement for a grant of 5 rupees to Liters

औरंगाबाद : स्वाभिमानी शेतकरी पक्षातर्फे 16 जुलैपासून राज्यभर करण्यात येणारे आंदोलन हे सरकारकडून दुधाला पाच रुपये प्रति लिटर अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात मिळाल्याशिवाय थांबणार नाही. असा इशारा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी बुधवारी (ता 11) सरकारला दिला. आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी जिल्ह्यांचे दौरे करत असून औरंगाबाद जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत तुपकर बोलत होते. 

स्वाभिमानीच्या आंदोलनाचा धसका घेऊन नुकतेच राज्य सरकारने दूध भुकटीच्या निर्यातीला 50 रुपये प्रति किलो अनुदान, लोणी तुपावरील जीएसटी कमी करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राला प्रस्ताव पाठविणार असल्याचे निर्णय घाईत घेतलेले आहेत. याचा शेतकऱ्यांना कवडीचाही फायदा होणार नाही. असा आरोप तुपकर यांनी केला. सरकारने जाहीर केलेले दीडपट हमीभाव हेही फसवे असून हमीभावात वाढ म्हणजे दीडपट हमीभाव नव्हे त्याऐवजी सीटू फॉर्म्यूला (बांधावर अनुदान) नुसार द्यावा. परंतू सरकार ए टू प्लस एफ एल (अंशतः) देत आहे. सरकारच्या आतापर्यंतच्या सर्वच योजना फसव्या ठरल्याचेही तुपकर म्हणाले. यावेळी प्रकाश पोकळे, चंद्रशेखर साळूंके, मारुती वऱ्हाडे, राणाचंद्रशेखर चंदन, मुक्ताराम गव्हाणे, कृष्णा साबळे, प्रल्हाद इंगळे यांची उपस्थिती होती. 

आंदोलनादरम्यान दूध ओतून देऊ नका 
16 जूलैपासून राज्यभर होणाऱ्या दूध बंद आंदोलनादरम्यान दूध ओतून देऊ नका, त्याऐवजी गरीबांना वाटा, सध्या सुरु असलेल्या दिंडीतील वारकऱ्यांना वाटा असेही आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. 

असे असेल आंदोलनाचे स्वरुप 
16 जूलैला दूध संघ, संकलन केंद्रावर दूध घालणे बंद केले जाणार आहे. त्यासोबतच मुंबईसह मोठ्या शहरात जाणारे दूधाचे टँकरही बंद केले जाणार आहे. सरकारने जर परराज्यातून दूध आयात केली तर आक्रमक पवित्रा घेऊन बंद करु असा दमही तूपकर यांनी दिला. सरकार दूधासाठी अनुदान देणार नाही तोपर्यंत हे आंदोलन गनिमी काव्याने राज्यभर सुरु राहणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com