जालन्यात तिसऱ्या दिवशी दूध आंदोलनाचे पडसाद

Jalna
Jalna

जालना : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध संकलन बंद आंदोलनाचे जालना जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी ही पडसाद जनवाले. बुधवारी (ता.18) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दुधाने भरलेला टँकर अडवून रस्त्यावर खाली केली.  तर तीन टँकरवर दगड फेक करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

जालना-नागपूर बायपास रोडवर औरंगाबाद येथून  दूध घेऊन निघलेले चार दुधाचे टँकर स्वभिमानी शेतकरी संघटनेच्या पदधिकारऱ्यांनी बुधवारी (ता.18) पहाटे सात वाजन्याच्या सुमारास अडविले. या चार टँकर पैकी एका टँकरमधील दूध रस्त्यावर सांडून दिले तर तीन टँकरची तोडफोड केल्याचे आंदोलनकार्त्यांनी सांगितले आहे.

या आंदोलनात स्वभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाअध्यक्ष डॉ. वैजीनाथ ढोरकुले, जिल्हा कार्याध्यक्ष निवृती शेवाळे, आंदोलन प्रमुख निवृती घुगे, अशोक मुरकुटे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिस बंदोबस्तामध्ये हे टँकर घटनास्थळा वरुण हलविन्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com