#MilkAgitation खासगी संघांचे दूध संकलन बीड जिल्ह्यात बंद

#MilkAgitation Milk collection of private union is closed in Beed district
#MilkAgitation Milk collection of private union is closed in Beed district

बीड  : दुध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दुध बंद आंदोलनाला सोमवारी (ता. १६) जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. शासकीय दुध संघाचे संपूर्ण संकलन झाले. तर, खासगी संघांचे संकलन बंद होते. 

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी मध्यरात्री शहरातील सोमेश्वर महादेवाला दुधाचा अभिषेक करुन आंदोलनाला सुरुवात केली. सोमवारी शहरात विक्रीसाठी आलेल्या सोनई या खासगी दुध उत्पादक संघाच्या गाड्या अडवून हवा सोडली. तसेच त्यातील दुधाचे पुढे काढून इन्फंट संस्थेतील विद्यार्थ्यांना वाटप केले. आंदोलनात महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा पुजा मोरे, जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, राजू गायके, धनंजय मुळे, अर्जुन सोनवणे, भाऊसाहेब घुगे, विकास आगाऊ, ज्योत्स्ना खोड आदींनी सहभाग घेतला.

१६५०० लिटर संकलन -
दरम्यान, जिल्ह्यात अंबाजोगाई येथील शासकीय दुध संकलन केंद्रावरुन रोज १६ हजार ५०० लिटर होणारे संकलन सोमवारी सुरळीत झाले. मात्र, बीड जिल्हा संघ, बीड तालुका संघ, गेवराई तालुका संघ, आष्टी तालुका संघांकडून रोज होणाऱ्या १ लाख १६ हजार लिटर दुध संकलनापैकी केवळ ३०० लिटर दुध संकलन झाले. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com