मंत्री कांबळेंनी मारहाणीचा प्रयत्न केल्याचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 मार्च 2017

नांदेड - मागासलेल्या समाजासाठी लोकस्वराज्य आंदोलन उभे केले; परंतु या चळवळीचा आवाज दाबण्याचे काम राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केले. आपल्याला मारहाण करण्याचा प्रयत्नही त्यांनी केल्याचा आरोप लोकस्वराज्य आंदोलनाचे प्रा. रामचंद्र भरांडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. या घटनेच्या निषेधार्थ राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा देऊन पोलिस ठाण्यात तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रा. भरांडे यांनी सांगितले, की समाजकल्याण विभागाच्या वतीने नांदेड येथे आज राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यासाठी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे नांदेडला आले होते. कार्यक्रमानंतर बडोले यांच्यासोबत आपण नागपूरमध्ये झालेल्या लाठीमाराची चौकशी झाली नाही, महाराष्ट्रात मागासवर्गीय समाजावर अत्याचार वाढत आहेत या बाबींवर चर्चा करत होतो. या वेळी पाठीमागून शिवीगाळ करत दिलीप कांबळे आले. त्यांनी आपल्याला धक्काबुक्की केली. चळवळीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. ही बाब अशोभनीय असून, या घटनेच्या निषेधार्थ राज्यभर आंदोलन करण्यात येईल. या वेळी संघटनेचे सुभाष कठारे, नागोराव कुडके आदी उपस्थित होते.