सेवाक्षेत्रासाठी औरंगाबादला प्रचंड वाव : सुरेश प्रभू 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 एप्रिल 2018

आगामी काळात उद्योग,व्यापार, वाणिज्य या तीन्ही गोष्टीत मराठवाड्याला मोठा फायदा होणार आहे. उद्योगांना भेडसवणाऱ्या जागा आणि पायाभूत सुविधेसाठी नवीन नीती तयार केली आहे. यातील प्रमुख मुद्दा हा उद्योगाला लागणारे इन्फ्रास्टक्‍चर्स तयार करून देण्याची जाबाबदारी सरकारची किंवा खाजगी संस्थाची राहणार आहे.

औरंगाबाद : "औरंगाबाद औद्योगिक क्षेत्राच्या वाढीसाठी योग्य उमेदवार आहे, त्याचप्रमाणे सेवा क्षेत्रासाठी या शहराला प्रचंड वाव आहे. यामुळे आगामी काळात होम सर्व्हिसह निरनिराळ्या सेवा, ऍडव्हस रोबोटिक्‍स हे काम येथे मोठ्या प्रमाणावर होऊ शकत असल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उड्डायनमंत्री सुुरेश प्रभू यांनी रविवारी (ता.22) पत्रकार परिषदेत सांगितले. 

आगामी काळात उद्योग,व्यापार, वाणिज्य या तीन्ही गोष्टीत मराठवाड्याला मोठा फायदा होणार आहे. उद्योगांना भेडसवणाऱ्या जागा आणि पायाभूत सुविधेसाठी नवीन नीती तयार केली आहे. यातील प्रमुख मुद्दा हा उद्योगाला लागणारे इन्फ्रास्टक्‍चर्स तयार करून देण्याची जाबाबदारी सरकारची किंवा खाजगी संस्थाची राहणार आहे. उद्योगांनी आपला वेळ आपल्या उत्पन्नाकडे द्यावा. सध्याच्या निर्मिती क्षेत्रास आधुनिकिरण करणे बरोबर नवीन उद्योग भारतात आणण्याचा प्रयत्न होत आहे. 

सेवा क्षेत्राला चालना देण्यासाठी 12 चॉम्पियनस सेक्‍टर शोधून काढणार आहे. कॅबिनेटने 5 हजार कोटी रूपये सेवा क्षेत्राच्या वाढीसाठी वापरणार आहे. सेवाक्षेत्रात देशांतर्गत्‌ सेवा क्षेत्राची वाढ आणि जागतिक स्तरावरील सेवा वाढ यातून करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले. शेतीसाठी कृषी निर्यात नीती जाहीर करण्यात आली आहे. यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यात येणार आहे.यांची अंमलबजावणीसाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सहा ठिकाणने शोधून काढण्यास सांगितले आहे. या सहा ठिकाणी एक्‍सपोर्ट प्रोसेसिंग सेंटर काढून स्थानिक निघणाऱ्या मालास जगभरातील बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी अरब, अमरित, सौदी अरबिया हे देश गुंतवणूक करण्यास तयार असल्याचेही यावेळी प्रभू यांनी सांगितले. 

सेवा निर्मिती आणि शेतीसाठी नवीन धोरण निर्माण करीत आहोत. रात्रीच्या वेळी देशार्गंत हवाई वाहतूक कमी असल्याने यावेळेत देशभरात एअर स्पेसचा एअर कार्गोसाठी वापरण्यात येईल. यासाठी 56 नवीन विमनतळाची निर्माण करण्यात येणार आहे. देशभरातील सर्व विमानतळाना भेटी देत आहेत, असेही प्रभू म्हणाले. यावेळी आमदार अतुल सावे, भागवत कराड, शिरिष बोराळकर उपस्थित होते. 

- बंगलोर-मुंबई प्रकल्पाचा मराठवाड्यास फायदा 
- देशात निर्मितीचा वाटा 20 टक्‍के व्यवसायासाठी विस्तृतपणे धोरण आखण्यात येत आहे. 
- जपान, कोरिया, युरोपातील काही देशाशी स्टॅटस्टिक करार, 
पर्यटक कनेक्‍टिव्हिटीसाठी एअर कनेक्‍टिव्हिटिवर भर 
साखरेची टंचाई दूर करण्याचा प्रयत्न

- विक्रमी साखरेची विक्रीसाठी चीनसह इतर देशांना विनंती 
सेवा

- साई एक्‍सर्पोट हब तयार करणार

- ड्रोनची देशात निर्मिती 
- देशात उद्योग वृद्धीसाठी सहा नवीन कॉरिडोर

Web Title: Minister Suresh Prabhu Praises Aurangabad City