मंत्र्यांची गॅस एजन्सी लुटणारी टोळी जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

औरंगाबाद - मध्य प्रदेशचे शिक्षणमंत्री विजय शाह यांच्या गॅस एजन्सीवर डल्ला मारून तीन लाख रुपये लंपास करणाऱ्या आंतरराज्य बिहारी टोळीच्या औरंगाबादेत मुसक्‍या आवळण्यात आल्या. शहरातील अनेक लॉजमध्ये छापासत्र राबविल्यानंतर बस स्थानक परिसर व भोईवाड्यातील एका लॉजमध्ये शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली. 

मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री विजय शाह यांच्याकडे शिक्षण खाते आहे. खांडवाच्या मालीकुआँ येथे त्यांची दिव्यज्योती गॅस एजन्सी आहे. गुरुवारी (ता. 20) पहाटे साडेचारला या गॅस एजन्सीत घुसून सहा जणांनी ड्रॉवरमधून तीन लाख सहा हजार रुपये लंपास केले.