आमदार विनायक मेटे यांनी साधला मतदारांशी संवाद 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

बीड - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसंग्राम प्रणीत भारतीय संग्राम परिषदेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी (ता. चार) आमदार विनायक मेटे यांनी विविध भागांत मतदारांशी संवाद साधला. 

चौसाळा, लिंबागणेश, नेकनूर, नांदूरघाट व येळंब या ठिकाणी बैठका घेत थेट मतदारांशी संवाद साधला. स्थानिक कार्यकर्त्यांनी अडीअडचणी आमदार मेटे यांच्यासमोर मांडल्या. सर्वसामान्य जनतेचे प्रश्‍न सोडवण्याचे काम करण्यासाठी सतत प्रयत्नशील असल्याने आमदार मेटे म्हणाले. निवडणुकीत शिवसंग्रामप्रणीत भारतीय संग्राम परिषदेच्या सर्व उमेदवारांना भरघोस मताने निवडून आणण्यासाठी प्रत्येक गावातील कार्यकर्त्याने कामाला लागावे असेही आवाहन आमदार विनायक मेटे यांनी केले. गावागावाच्या कार्यकर्त्यांचा बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

या वेळी प्रभाकर कोलांगडे, राजेंद्र मस्के, अशोक लोढा, अनिल घुमरे, नितीन लोढा, रामहरी मेटे, भारत काळे, बबन माने, रामदास नाईकवाडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.