भूम येथे जीपमधून अडीच लाख ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

भूम - पालिका निवडणूक पथकाने शहरात येणाऱ्या एका जीपमधून अडीच लाखांची रोकड सोमवारी जप्त केली. ही रक्कम पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे.

भूम - पालिका निवडणूक पथकाने शहरात येणाऱ्या एका जीपमधून अडीच लाखांची रोकड सोमवारी जप्त केली. ही रक्कम पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे.

भूम पालिका निवडणुकीसाठी स्थापन केलेल्या पथक क्रमांक एकचे शहाजी श्रीमंत अधारे यांनी पार्डी रस्त्याने शहरात येणाऱ्या जीपची दुपारी संशयावरून तपासणी केली. चालक स्वागत माणिक नलवडे (रा. बार्शी, जि. सोलापूर) याची चौकशी केली असता, जीपमध्ये दोन लाख 49 हजार 500 रुपये आढळले. त्यात एक हजारच्या 143 नोटा व 500 रुपयांच्या 213 नोटांचा समावेश होता. निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे यांनी रक्‍कम जप्त केली. ही रक्‍कम इंडियन इलेक्‍ट्रिक कंपनीची (माढा रोड, वैराग) असून, बार्शी येथून निघून येरमाळा, तेरखेडा येथील ग्राहकांकडून ती वसूल केल्याचे जीपचालकाने सांगितले. जप्त केलेली रक्कम पोलिसांकडे देण्यात आली आहे.

टॅग्स