नांदेड जिल्ह्यात दीड वर्षांत 200हून अधिक शेतकऱ्यांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

सत्तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या ठरल्या अपात्र
नांदेड - आस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोरील भय संपण्याचे नाव घेत नाही. गत दीड वर्षांच्या काळात २३० शेतकऱ्यांनी आत्महत्या जीवनयात्रा संपविली आहे. यात जवळपास ७० आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या निकषास पात्र ठरल्या नाहीत.

सत्तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या ठरल्या अपात्र
नांदेड - आस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोरील भय संपण्याचे नाव घेत नाही. गत दीड वर्षांच्या काळात २३० शेतकऱ्यांनी आत्महत्या जीवनयात्रा संपविली आहे. यात जवळपास ७० आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या निकषास पात्र ठरल्या नाहीत.

नांदेड जिल्ह्यात गत काही वर्षांपासून दुष्काळ झाला, की आवकाळी पाऊसाचा तडका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यानंतर कसेबसे पीक आले, की सरकारच्या शेतकऱ्याप्रती सुलतानी कारभार. उत्पादनाला मिळणारा कवडीमोड भाव, यातून शेतीवर केलेला खर्च बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यातली-त्या बॅकांचे कर्ज वरून सावकारचा तगादा. यात शेतकरी मानसिक दृष्टया खचत आहे.

कुटुंब प्रपंच, मुला-बाळांची शिक्षण, मुलीचे लग्न, या सगळया बाबी सांभाळताना, निसर्गाचा होणारा लहरीपणा, अन वाढत जाणारा कर्जाचा डोंगर फेडणे शेतकऱ्यांना नाकीनऊ येते. सावकार कर्जापायी शेत लिहून घेण्याची भाषा करतो. अन शेतकऱ्यांना मरणावाचून गत्यंतर नाही. अशी भावना जेव्हा सतत घर करून बसते. तेव्हा शेतकरी आत्महत्येचा विचार करतो. अन शेवटी आत्महत्या करून या जगाचा निरोप घेत असतो.

मागच्या वर्षी एक जानेवारी ते ३१ डिसेंबर दरम्यान १८० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील पात्र शेतकरी आत्महत्या ११७ ठरल्या आहेत. तर अपात्र ६३ इतक्या आहेत. यातील शंभर टक्के प्रकरणे निकाली निघाले आहेत. तर सन २०१७ मध्ये मे महिन्यांपर्यंत ५४ शेतकऱ्यांनी जीवनाचा त्याग केला आहे. यातील ३७ शेतकरी आत्महत्या पात्र ठरल्या आहेत. अपात्र ५ असून १२ प्रकरणे प्रलंबित आहेत.

दीड वर्षांमधील आत्महत्या
महिना-----सन २०१६----२०१७

जानेवारी--- १४---------११
फेबु्रवारी----१२---------११
मार्च-----१२---------१५
एप्रिल----१९---------१३
मे------१८---------४
जूने------१२---------०
जुलै------१०---------०
ऑगस्ट------२०---------०
सप्टेंबर------१७---------०
ऑक्टोबर------१७---------०
नोव्हेंबरे------१६---------०
डिसेंबर------१३---------०

शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने समस्या सुटतात, असे थोडेच आहे. उलट शेतकऱ्यांच्या कुटुंबियासमोरील संकटे अधिकचे उभे राहतात. कुटुंब उघडयावर येते. शेतकरी आत्महत्यानंतर मिळणारी मदत हा गौण विषय आहे. परंतू त्या कुटुंबामधील करविता शेतकरी निघून जाणे म्हणजे, कुटुंबावर डोंगर कोसळल्यासारखे असते, अशी एक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीने सांगितले.

मराठवाडा

समाजवादी पक्ष महापालिकेच्या ५० जागा लढविणार नांदेडः सद्या देशाची अवस्था वाईट असून, धर्माच्या नावाने सत्तेत आलेले भाजप गाय व...

07.00 PM

औरंगाबाद : उर्ध्व भागात सतत जोरदार पाऊस होत असल्याने मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या जायकवाडीतील पाणीसाठा 88.10 टक्‍यावर...

02.21 PM

माजलगाव (जि. बीड) : शहरालगतच असलेल्या अकरा पुनर्वसित गावामध्ये ऐन सणासुदीच्या दिवसांत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा  ...

12.09 PM