मुलीला पळविल्याच्या  धक्‍क्‍यातून आईची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

परळी - गावातील दोघांनी मुलीला पळवून नेल्याचा मानसिक धक्का बसल्याने आईने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना तालुक्‍यातील खोडवा सावरगाव येथे सोमवारी (ता. २३) उघडकीस आली. 

परळी - गावातील दोघांनी मुलीला पळवून नेल्याचा मानसिक धक्का बसल्याने आईने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना तालुक्‍यातील खोडवा सावरगाव येथे सोमवारी (ता. २३) उघडकीस आली. 

अल्पवयीन मुलीला १७ एप्रिल रोजी गावातीलच शैलेश बालाजी दहिफळे व सिद्धेश्वर बालाजी दहिफळे यांनी पळवून नेले. मुलीला पळवून नेल्याच्या घटनेने आईला मानसिक धक्का बसला. या प्रकरणी १९ तारखेस परळी ग्रामीण ठाण्यात दोन्ही तरुणांवर अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान, त्याच दिवशी सायंकाळी साडेसात वाजता मुलीच्या आईने घरी विष प्राशन केले. त्यांना तातडीने अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यांचा शुक्रवारी (ता. २०) उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी शैलेश दहिफळे व सिद्धेश्वर दहिफळे यांच्यावर आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान, 

अल्पवयीन मुलीला पळवून नेणारे दहिफळे बंधू फरार असतानाच त्यांच्यावर आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा दुसरा गुन्हा नोंद झाला आहे. त्यांच्यासह अपहृत मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही. आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Mother committed suicide

टॅग्स