नोटाबंदीनंतर करवसुलीत महापालिका राज्यात तिसरी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

औरंगाबादेत करवसुलीची रक्कम साठ कोटींच्या घरात
औरंगाबाद - केंद्र सरकारने जुन्या 500 व 1000 रुपयांच्या नोटा चालनातून बाद केल्यानंतर गेल्या बारा दिवसांत महापालिकेकडे 59 कोटी 66 लाख रुपयांच्या विविध करांची वसुली झाली आहे. राज्यातील 27 महापालिकांमध्ये मुंबई, पुणेपाठोपाठ औरंगाबाद महापालिकेने करवसुली करून तिसऱ्या क्रमांकावर आघाडी घेतली आहे. नगरविकास विभागाच्या सचिव श्रीमती मनीषा पाटणकर-म्हैसकर यांनी मुंबईत सोमवारी (ता.21) ही माहिती दिली.

केंद्र सरकारने मंगळवारी (ता.आठ) च्या मध्यरात्रीपासून जुन्या 500 व 1000 रुपये मूल्याच्या नोटा व्यवहारातून रद्द केल्या. राज्यातील महानगरपालिका व नगरपालिकांच्या विविध करांचा भरणा व थकबाकी भरण्यासाठी नागरिकांची अडचण होऊ नये, यासाठी या जुन्या चलनातील नोटा स्वीकारण्यास परवानगी मिळावी, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारला केली. मुख्यमंत्र्यांनी केलेली विनंती व जनतेची अडचण होऊ नये यासाठी केंद्र सरकारने चलनातून रद्द करण्यात आलेल्या नोटा नागरिकांकडून स्वीकारण्यास परवानगी दिली होती.

नागरिकांना कर भरणे सुलभ व्हावे यासाठी राज्यातील महानगरपालिका व नगरपालिकांची कार्यालये शासकीय सुटीच्या दिवशीही सकाळी आठपासून ते मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवली होती. या संधीचा फायदा घेण्यासाठी राज्यातील नागरिक विविध करांचा भरणा व थकबाकी भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत.

या काळात औरंगाबाद महापालिकेकडे 59 कोटी 66 लाख रुपयांची वसुली झाली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी जुन्या चलनातील नोटा 24 नोव्हेंबरपर्यंत स्वीकारण्यात येणार असल्याने नागरिकांनी या संधीचा फायदा घेऊन आपल्याकडील करांचा भरणा व थकबाकी जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मराठवाडा

औरंगाबाद - दाक्षिणात्य चित्रपटांत भररस्त्यात पाठलाग करून तलवारीने सपासप वार करून खुनी हल्ल्याचे प्रकार चित्रित होतात, तसे प्रकार...

01.42 AM

औरंगाबाद : हनुमंतखेडा (ता. सोयगाव) येथील अल्पवयीन मुलीच्या हत्येच्या निषेधार्थ शुक्रवारी (ता. 18) बंजारा समाजातर्फे क्रांती चौक...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

फुलंब्री (औरंगाबाद) : शासनाने तात्काळ पिकांचे पंचनामे करून दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी औरंगाबाद-जळगाव या राज्य महामार्गावर...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017