नागपूर-मुंबई महामार्ग दुरुस्तीसाठी आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

लासूर स्टेशन - लासूर स्टेशन (ता.गंगापूर) येथील नागपूर-मुंबई महामार्गाची ए.एस. क्‍लब ते वैजापूर दरम्यान दुरवस्था झाली असून महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेकांचे बळी जात असतानाही सुरू असलेली टोल वसुली थांबवावी, महामार्गाचे डांबरीकरण करावे, या मागणीसाठी बुधवारी (ता.एक) महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रीय समाज पक्ष, शेतकरी कामगार पक्षातर्फे निदर्शने करण्यात आली. रस्ता दुरुस्तीचे लेखी आश्वासन मिळाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

नागपूर-मुंबई महामार्गावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे अनेक अपघात झाले तरीही लासूर स्टेशन परिसरात भानवाडीच्या टोलनाक्‍यावर पथकर वसुली मात्र जोरात सुरू असल्याने रस्ता दुरुस्त करावा तोपर्यंत टोल घेऊ नये, या मागणीसाठी परिसरातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी बुधवारी टोलनाक्‍यावर निदर्शने केली. दरम्यान, मागणी पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन मिळेपर्यंत आमरण उपोषण करण्यास कार्यकर्त्यांनी प्रारंभ केला असता सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. चव्हाण यांनी येत्या वीस दिवसांत या महामार्गावरील खड्डे बुजविण्यात येतील असे लेखी  आश्वासन दिले.

नाक्‍यावरील निदर्शनामुळे तीन तास टोलवसुली बंद होती. या वेळी अण्णासाहेब जाधव, सुरेश फुलारे, रामेश्वर पोपळघट, रियाज पटेल, महेश गुजर पाटील, गणेश सोनवणे, दिगंबर गोटे, सुमित त्रिवेदी, श्‍याम शर्मा, अशोक सोनवणे, नवनाथ शिंदे, भूषण रणयेवले, महावीर कोठारी, विलास काळे, योगेश निकम, बाबासाहेब चव्हाण, रामसिंग सुलाने, भाऊसाहेब गुंड, सचिन साळुके, पंकज गायकवाड, सुनील पेंभरे, सुरेश तांबे, राहुल तायडे, आनंद आसने, अभिजीत गायकवाड, रामा काळे, सोहेल पठाण, नितीन कवडे, शुभम राजपूत, राहुल डोणे, अनिल जवादे, शुभम मंडावत, अशोक काळवणे, राजेंद्र शाबादे, योगेश काळवणे, सतीष काळवणे, केदार फड, निवृत्ती सातपुते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.