भावाच्या खूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

उस्मानाबाद - सख्ख्या भावाचा खून केल्याप्रकरणी श्‍याम विष्णू यादव याला जिल्हा सत्र न्यायालयाने शुक्रवारी (ता.6) जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तामलवाडी येथील बालाजी अमाईन्स कंपनीसमोर गंजेवाडीच्या रस्त्यावर नामदेव विष्णू यादव याचा 13 ऑगस्ट 2014 रोजी खून झाला होता. शुक्रवारी (ता. सहा) या खटल्याचा निकाल जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आय. पठाण यांनी दिला. 

उस्मानाबाद - सख्ख्या भावाचा खून केल्याप्रकरणी श्‍याम विष्णू यादव याला जिल्हा सत्र न्यायालयाने शुक्रवारी (ता.6) जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तामलवाडी येथील बालाजी अमाईन्स कंपनीसमोर गंजेवाडीच्या रस्त्यावर नामदेव विष्णू यादव याचा 13 ऑगस्ट 2014 रोजी खून झाला होता. शुक्रवारी (ता. सहा) या खटल्याचा निकाल जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आय. पठाण यांनी दिला. 

श्‍याम यादव व नामदेव यादव या दोघांमध्ये घर विकलेल्या पैशांच्या कारणावरून वाद सुरू होते. नामदेव हा श्‍यामला सतत पैशांची मागणी करत होता. 13 ऑगस्ट 2014 रोजी पैशाच्या कारणावरून श्‍यामने सोलापूर येथून मोटारसायकलवरून तामलवाडी येथील बालाजी अमाईन्स कंपनीच्या पुढे गंजेवाडीला जाणाऱ्या रस्त्यावर नामदेवला नेले. त्या ठिकाणी श्‍यामने नामदेववर चाकूने वार करून त्याचा खून केला व तेथून तो पसार झाला. तेथील रहिवासी मोहन काळे यांनी रस्त्यावर मृतदेह पाहिल्यानंतर तामलवाडी पोलिस ठाण्याला माहिती दिली. सुरवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मृताची ओळख पटविण्यासाठी तामलवाडी पोलिस सोलापूरला गेले असता, तेथील पोलिस ठाण्यात नामदेव मिसिंग असल्याची नोंद होती. ही नोंद श्‍यामनेच दाखल केली होती. पोलिसांनी मृताची ओळख पटविण्यासाठी श्‍यामला तामलवाडीत आणले. या प्रकरणाचा अधिक तपास केल्यानंतर श्‍याम यादव यानेच नामेदवला 13 ऑगस्टला सोबत घेऊन गेल्याचे समोर आले. त्यानंतर या खूनाचे गूढ उकलले. श्‍याम यादव याच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. त्याच्याविरुद्धचे आरोप सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षाच्या वतीने एकूण 14 साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयासमोर आलेले पुरावे व अतिरिक्त सरकारी वकील महेंद्र देशमुख यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आय. पठाण यांनी श्‍याम यादव याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 

मराठवाडा

माहूर : महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूरगडावरिल श्री रेणुकादेवी संस्थानतर्फे श्रावणमास...

03.51 PM

पूर्णा : तालुक्यात दोन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर वरूनराजाचे दमदार आगमन झाले आहे. अतीवृष्टीने तालुक्यातील धानोरा काळे येथील...

03.24 PM

जालना : मागील महिनाभरापासून गायब असलेल्या पावसाने रविवारी (ता.20) जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. जिल्ह्यातील काही तालुक्यामध्ये...

03.18 PM