नांदेड जिल्ह्यात दीड वर्षात वीज पडून 29 जण ठार

जयपाल गायकवाड
शुक्रवार, 19 मे 2017

शासनाची आधुनिक यंत्रणा तोकडी; जनजागृतीची आवश्यकता

नांदेड: पूर्वमोसमी व मोसमी हंगामात ढगांचा गडगडाट होऊन वीज कोसाळण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. अशा वीज मे महिन्यांपासून पडत असतात. गेल्या दीड वर्षांच्या काळात वीज कोसळून जिल्ह्याच 29 लोकांचे प्राण गेले आहेत. यात पुरूषांचे प्रमाण अधिक आहे. म्हणून वीज अटकाव यंत्रणांची संख्या वाढविण्याची नितांत गरज आहे.

शासनाची आधुनिक यंत्रणा तोकडी; जनजागृतीची आवश्यकता

नांदेड: पूर्वमोसमी व मोसमी हंगामात ढगांचा गडगडाट होऊन वीज कोसाळण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. अशा वीज मे महिन्यांपासून पडत असतात. गेल्या दीड वर्षांच्या काळात वीज कोसळून जिल्ह्याच 29 लोकांचे प्राण गेले आहेत. यात पुरूषांचे प्रमाण अधिक आहे. म्हणून वीज अटकाव यंत्रणांची संख्या वाढविण्याची नितांत गरज आहे.

जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून वीज अंगावर पडून अनेक शेतकरी, सामान्य नागरिक, मजूर, महिला, लहान मुले; तसेच जनावरे दगावली आहेत. या घटनेची नोंद तहसील प्रशासनाद्वारे जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती विभागात केली जाते. गेल्यावर्षी जानेवारी ते डिसेंबर 2016 या दरम्यान वीज पडून 23 जणांचा मृत्यू झाला आहे. यात अठरा पुरूष, चार महिला व एक बारा वर्षीय बालिकेचा समावेश आहे. जानेवारी ते मे 2017 पर्यंत वीज पडल्याने सहा जणांना आपला जीव गमवावा लागला. यात सहा पुरूषांचा समावेश आहे. मागच्या आठवड्यात दोन दिवसांंमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. जिल्हा प्रशासनाच्या वतीने वीज पडून मृत्यू पावलेल्यांना शासनातर्फे प्रत्येकी चार लाख रूपयांची मदत केली जाते. मृतांच्या नातेवाईकांना व जखमींना मदत केली गेली आहे. अनेक मृत्यू झाडाखाली, टेकडी किंवा डोंगराचा माथ्याखाली थांबल्याने झाले आहेत. वीज अंगावर पडू नये, यासाठी नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे; परंतु अनेकजण पावसापासून बचाव करण्यासाठी झाडाखाली थांबतात. अशी गफलत केल्याने मृत्यू ओढावतो. त्यामुळे वीज पडत असताना शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन होणे आवश्यक असते. वीज पडू नये, यासाठी शासनाने जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापन हा विभाग स्थापला; मात्र या विभागाने उभारलेल्या आधुनिक यंत्रणेचा फारसा उपयोग होत नसल्याचे दिसून येते. यासाठी खास करुन ग्रामीण भागात जनजागृतीची गरज असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पूर्वसूचना देणारी यंत्रणा
नांदेड जिल्ह्यात वारंवार पडणाऱ्या विजेच्या घटनांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे शासनाच्या वतीने पुणे येथील शास्त्रज्ञांनी नांदेड जिल्ह्यातील वीज प्रवण गावांना भेटी देवून लायटींग इन्फॉरमेशन प्रीडीक्शन सिस्टम अर्थातच वीज पूर्वसूचना देणारी यंत्रणा भोकर येथील तहसील कार्यालयाच्या इमारतीवर कार्यान्वित करण्यात आली आहे.

तालुकानिहाय मृतांची संख्या
लोहा- १, कंधार-२, मुखेड- ५, भोकर-४, हिमायतनगर-१, बिलोली-८, मुदखेड- १, हदगाव- १, अर्धापूर- १,
किनवट- ३, नायगाव - १, नांदेड- १ ः एकुण - २९