नांदेड-चाकूर रेल्वेमार्गासाठी राज्याने अर्धा वाटा उचलावा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

अहमदपूर - अर्थसंकल्पात घोषित झालेल्या नांदेड-लातूर रोड व्हाया लोहा-अहमदपूर-चापोली-चाकूर रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाने अर्धा वाटा उचलावा, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बुधवारी (ता. १५) आमदार विनायकराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील रेल्वे संघर्ष कृती समिती व मराठवाडा जनता विकास परिषदेच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली. 

मुंबई येथे रेल्वे संघर्ष कृती समितीच्या निवडक प्रतिनिधींनी आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली  मुख्यमंत्र्यांची विधान भवनात भेट घेतली. या वेळी नांदेड-लातूर रोड व्हाया लोहा-अहमदपूर- चापोली हा मार्ग अतिशय महत्त्वपूर्ण मार्ग आहे. या मार्गासाठी केंद्र सरकारने रेल्वे अर्थसंकल्पात एक हजार पाचशे साठ कोटी रुपयांची तरतूद केली आहे, परंतु सर्व्हेचे काम अतिशय थंड्या पद्धतीने चालू आहे. मध्यंतरी तर फेरसर्व्हे करणार असल्याचे विभागाच्या वतीने सांगितले जात होते. या सर्व पार्श्‍वभूमीवर आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा जनता विकास परिषद व रेल्वे संघर्ष कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन वस्तुस्थिती निवेदन केली. 

या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील विविध प्रलंबित रेल्वेमार्ग आहेत, त्यास प्राधान्य देण्याचे धोरण आहे, तसेच नांदेड- लातूर रोड या नवीन रेल्वे मार्गासाठीसुद्धा प्राधान्यक्रम रेल्वे विभागाकडे कळविला असून, राज्यशासन आपला वाटा उचलणार असल्याचे सांगितले. या वेळी रेल्वे संघर्ष कृती समितीचे सचिव डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, दमरेचे क्षेत्रीय सल्लागार समितीचे सदस्य, आदर्श ग्राम संयोजक निवृत्ती यादव, धीरज भंडे पाटील यांची उपस्थिती होती.