नांदेड: जिल्‍ह्यात शंभरावर रुग्णांस डेंग्युची लागण

In the Nanded district hundreds of patients are infected with Dengue
In the Nanded district hundreds of patients are infected with Dengue

नांदेड - पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. त्यातच शहरवाशीयांना महापालीके कडून दोन दिवसाआड पाणी पुरवठा होतो. यामुळे पाण्याचा तुटवडा भासुनये म्हणून शहरातील बहुतेक नागरीक जास्तीचे व अनावश्यक पाणी साठऊन ठेवत अाहेत. या एकमेव कारणामुळे महापालिका क्षेत्रातील १०७ संशयीत रक्त व पाण्यांच्या नमुन्यांनपैकी ३० रुग्णांना गेल्या नऊ महिन्यात कालावधीत डेंग्युची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. 

१ जानेवारी ते ३१ आॅगस्ट'२०१७ दरम्यान जिल्ह्यातील धर्माबाद तालुका वगळता इतर पंधरा तालुक्यातील तालुका निहाय ४०२ संशयित डेंग्युच्या आजारी रुग्णांच्या रक्ताची विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात तपासणी करण्यात आली होती. यापैकी जिल्ह्यातील ११४ जणांना डेंग्युची लागण झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. आजच्या तीन वर्षापूर्वी जिल्हात डेंग्युच्या आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ७४ इतकी होती. त्यामुळे डेंग्यु आजारावर नियंत्रण मिळविण्यात नांदेड जिल्ह्यास यश आले असे वाटत असतांनाच मागील दोन वर्षासह चालु आर्थिक वर्षातील डेंग्युच्या आजारात झपाट्याने वाढ होत असल्याचे आकडे वारीतून दिसून येत आहे. त्यामुळे तुटपुंज्या मनुष्य बळाच्या जोरावर डेंग्यु निर्मुलनासाठी निघालेल्या जिल्हा हिवताप विभागास पुढील काळात तरी, डेंग्यु आजारावर नियंत्रण मिळविणे शक्य होईल, डेंग्युवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिका तरी कसोटीवर उतरेल का ? असा सवाल सर्व सामान्य नागरीकाकडून उपस्थित केला जात आहे.

  • सर्व आककडे वारी (एक जानेवारी ते ३१ आॅगस्ट'२०१८ तालुका निहाय)

रक्त तपाणी व डेंग्य आजाराची लागण रुग्ण संख्या 
- माहूर- तीन, शुन्य
- किनवट-सात, दोन
- हदगाव-१९, सात
- हिमायतनगर-१३, चार
- उमरी-नऊ, एक
- भोकर- दहा, दोन
- नांदेड- ४३,१५
- मदखेड-१५, चार
- आर्धापूर-२६, पाच
- मुखेड-१२, तीन
- लोहा-५७, १८
- कंधार-२७, सहा
- नायगाव-३१, ११
- बिलोली-१२, दोन
- धर्माबाद- शुन्य, शुन्य
- देगलुर-११, तीन
- नांदेड महापालिका १०७, ३०
अशी एकुण ४०२ संशयित रुग्णांपैकी ११४ रुग्णाना डेंग्युची लागण झाली.

स्वच्छ पाण्यात डेंग्युच्या डासांची मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती होते. नागरीकांनी घरामध्ये जास्तदिवस पाणी साठऊन ठेऊ नये, घरातील रांजन, पाण्याची टाकी उघडी ठेऊ नये. आठवड्यातूल एकदिवस तरी, सर्वभांडी कोरडी करुन भरावीत कुलर, डेझर्ट कोरड करावेत व रात्री झोपतांना योग्यती खबरदारी घ्यावी. - डॉ. अकाश देशमुख (जिल्हा हिवताप अधिकारी, नांदेड)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com