नांदेडहून हजसाठी विमानसेवा सुरू व्हावी - अशोक चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

नांदेड - विदेश मंत्रालय, पुणे क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय आणि पोस्ट विभागाने संयुक्त उपक्रम हाती घेत नांदेडला पासपोर्ट कार्यालय सुरू करून मोठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विदेश विभागाने इथेच थांबू नये तर नांदेड येथून थेट हजयात्रेसाठी विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी खासदार अशोक चव्हाण यांनी रविवारी (ता. आठ) केली. 

नांदेडच्या मुख्य डाकघर येथे आयोजित पासपोर्ट कार्यालयाचे खासदार चव्हाण यांच्या हस्ते सकाळी उद्‌घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विदेश मंत्रालयाचे संयुक्त सचिव मनीष गुप्ता, विभागीय पोस्टमास्टर प्रणवकुमार, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, पोलिस अधीक्षक चंद्रशेखर मीना, क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी अनंत ताकवाले, उपमहापौर विनय गिरडे, सभापती शमीम अब्दुल्ला, वीरेंद्रसिंग गाडीवाले, अब्दुल सत्तार आदी उपस्थित होते. 

श्री. चव्हाण म्हणाले, की विदेश मंत्रालयाने येथे पासपोर्ट प्रक्रियेसाठी कार्यालय सुरू केल्याबद्दल विदेश मंत्री सुषमा स्वराज यांचे आभार मानले पाहिजे. आम्ही पाठपुरावा केला होता आणि सुषमा स्वराज यांनी उत्तर पाठवून आश्वासन दिले होते. राजकारण बाजूला सारून त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. असा उल्लेख करून चव्हाण म्हणाले, प्रवाशांना चांगल्या सेवासुविधा अपेक्षित आहेत. ज्या प्रकारे अबूधाबी (दुबई) येथे अमेरिकन ॲम्बेसीच्या वतीने इमिग्रेशन प्रक्रियेसाठी सेवा सुरू केली, त्या धर्तीवर मुंबई येथेही अमेरिकन ॲम्बेसीच्या वतीने सेवा सुरू करावी. मनीष गुप्ता यांनी आमची मागणी केंद्रापर्यंत पोचवावी, असे त्यांनी नमूद केले. नांदेडच्या पोस्ट कार्यालयाची नवीन इमारत झाली पाहिजे, असेही ते म्हणाले. यावेळी मान्यवरांनी मनोगतात पासपोर्ट कार्यालय लोकांच्या फायद्यासाठी असल्याचे सांगितले.

Web Title: nanded to haj plane service demand ashok chavan