नांदेड - राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयाच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांची संयुक्त बैठक नांदेडला रविवारी (ता.19) पार पडली. विविध मागण्यांसंदर्भात सर्व संघटनांनी मिळून राज्य ग्रंथालय महासंघाची स्थापना केली आहे. नजीकच्या काळात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्याचा इशाराही सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आला आहे.
राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयाचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी नांदेडला बैठक घेऊन सर्व संमतीने राजकारण विरहित सर्वांना एकत्र घेऊन चालणारी सर्व संघटनांची एक संघटना घोषित करावी, असे ठरविले. त्यानुसार राज्य ग्रंथालय महासंघाची स्थापना करण्यात आली असून प्रदेशाध्यक्षपदी महेंद्र बोरसे पाटील (जळगाव) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
राज्यस्तरीय आंदोलन 28 हजार सातशे कर्मचारी सहभागी होणार आहेत, असे बोरसे यांनी सांगितले.
|