तरुणींना परराज्यांत विकणारी टोळी अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

नांदेड - अकोला येथे कुरकुरे बनविण्याच्या कारखान्यात नोकरी लावते, असे आमिष दाखवून परराज्यांत विक्री करण्याचा डाव पीडित तरुण महिलेच्या प्रसंगावधानाने उघडकीस आला. या प्रकरणी वजिराबाद पोलिसांत या टोळीतील चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

नांदेडमधील एका महिलेने धनेगाव पंकजनगरमध्ये राहणाऱ्या दोन तरुण महिलांना अकोला येथे कुरकुरे तयार करण्याच्या कारखान्यात नोकरी लावते, असे आमिष दाखविले. त्यापोटी बयाणा म्हणून पीडित महिलांना 40 हजार रुपयेसुद्धा दिले. 28 मेच्या दुपारी येथील मध्यवर्ती बसस्थानकातून नांदेड-अकोला या एसटी बसमध्ये मुस्ताक शहा नूरखान व त्याच्या इतर साथीदारांसोबत बसवून दिले; परंतु हा प्रकार संशयास्पद असल्याचे एका पीडितेच्या लक्षात आले. आखाडा बाळापूर येथे तिने पोलिसांना कळवून सोबतच्या तिन्ही आरोपींना ताब्यात दिले व स्वत:ची सुटका करून घेतली. त्यानंतर पीडित महिलेने नांदेडमध्ये येऊन नोकरीचे आमिष दाखविणाऱ्या महिलेला खरी माहिती विचारली, तेव्हा तिने दोघींना राजस्थानमध्ये एक लाख 15 हजारांना विकल्याचे लक्षात आले. 

Web Title: nanded news The gang arrested of women sold